टीम – पुणेरी टाइम्स
कुरकुंभ प्रतिनिधी:- आलिम सय्यद
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुरकुंभ येथे दोन वाहनांचा अपघात झाला आहे. यामध्ये पुणे दिशेने सोलापूर दिशेला एका AC चे मटेरियल घेऊन चाललेल्या मालवाहतूक टेम्पोचा टायर फुटल्याने दुरुस्तीसाठी थांबलेल्या टेम्पोला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिल्याने हा अपघात घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अपघातात टायर फुटल्याने टेम्पो बाजूला उभा करून टेम्पो चालक नादुरूस्त चाक खोलून दुसरे चाक बसवत होता. त्या क्षणी पाठीमागून येणारे दोनवाहने ओहरटेक करण्याच्या नादात त्या चालकाचा ट्रक वरील ताबा सुटल्याने टायर फुटलेल्या उभ्या टेम्पोला पाठीमागून जबर धडक बसल्याने हा अपघात झाला असून या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातामुळे असे दिसून येत आहे की, पाटस टोल प्रशासनाचे ढिसाळ नियोजन व रस्ते महामार्गातील त्रुटी असल्याचे दिसून येत आहे, महामार्गावरती अपघातामध्ये अनेकांचे जीव जातात मात्र प्रशासन भानावर येत नाही. त्यामुळे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे प्रकार संचालकांना भानावर येण्याची गरज आहे…