ठळक बातम्या

कुरकुंभ MIDC परिसरात ‘प्लेटची’ चोरी करणाऱ्या ‘चार चोरट्यानां’ दौंड पोलीसांनी कडून बेड्या, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त- सपोनि नागनाथ पाटील यांची माहिती……दौंड मध्ये’ रमेश थोरातां’साठी “शरद पवार” कोणता डाव टाकणार? महाविकास आघाडीची आज वरवंडला जाहीर सांगता सभा…दौंडच्या राजकारणात नवा ट्विस्ट येणार! खासदार ‘निलेश लंके’ यांचे आव्हान आमदार ‘राहुल कुल’ यांनी स्विकारले, विरोधकांच्या “भूमिकेकडे” तालुक्याचे लक्ष…?निवडणूकीच्या धामधुमीत ‘आमदार राहुल कुलांकडून’ आरोग्य सेवेचे व्रत सुरूच, महिनाभरात “वीसहुन” अधिक रुग्णांना मदत…दौंड विधानसभा मतदारसंघाकरीता निवडणूक निरीक्षक म्हणून एम गौतमी यांची नियुक्ती

औरंगाबादच्या बाजारात आंबा स्वस्त झाला

औरंगाबाद, 6 जून : शहरातील बाजारपेठेमध्ये आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे आंब्याचे दर (Mango prices) आता कमी झाले आहेत. हंगामाच्या शेवटी आंब्याच्या किमती कमी झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा आमरस गोड होणार आहे. उन्हाळा सुरू झाल्यानंतर सर्वांनाच आंब्याची चव चाखायची असते. मात्र, सुरुवातीला आंब्याचा किमती सामान्यांच्या आवाक्यात नव्हत्या. पण, आता बाजारात आवाक (Aurangabad market) वाढल्याने आंबा आता स्वस्त होत आहे.

आतापासून आंब्यांचा हंगाम संपत आला आहे आणि यातच आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे आंब्याचे किमती कमी झाल्या आहेत. यामध्ये केसरी, बदाम, लंगडा, हापूस आंब्याला मोठी मागणी बाजारपेठेत आहे. पिवळ्याधमक आंब्यापेक्षा कृत्रिम पद्धतीने पिकविलेल्या आंब्यांना द्यावी पसंती मिळत आहेत.

वाचा : Onion Rate : राज्यातील राहाता बाजार समितीत कांद्याचे ‘वांदे’ मिटले, दरात झाली एवढी वाढ

लालबाग, केसर, पायरी आंबा बाजारपेठेमध्ये 50 ते 100 रुपये किलोप्रमाणे विकला जात आहे. तर, हापूस आंब्याचे दर 400 वरून 200 रुपयांवर आलेले आहेत. आंब्याचा सीझन संपत असल्याने त्यासोबतच पाऊस अवघ्या काही दिवसांवर आल्याने पाऊस पडल्याचे आंब्यांचे किमती आणखी कमी होतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link

Leave a Comment

[adsforwp id="47"]