ठळक बातम्या

कुरकुंभ MIDC परिसरात ‘प्लेटची’ चोरी करणाऱ्या ‘चार चोरट्यानां’ दौंड पोलीसांनी कडून बेड्या, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त- सपोनि नागनाथ पाटील यांची माहिती……दौंड मध्ये’ रमेश थोरातां’साठी “शरद पवार” कोणता डाव टाकणार? महाविकास आघाडीची आज वरवंडला जाहीर सांगता सभा…दौंडच्या राजकारणात नवा ट्विस्ट येणार! खासदार ‘निलेश लंके’ यांचे आव्हान आमदार ‘राहुल कुल’ यांनी स्विकारले, विरोधकांच्या “भूमिकेकडे” तालुक्याचे लक्ष…?निवडणूकीच्या धामधुमीत ‘आमदार राहुल कुलांकडून’ आरोग्य सेवेचे व्रत सुरूच, महिनाभरात “वीसहुन” अधिक रुग्णांना मदत…दौंड विधानसभा मतदारसंघाकरीता निवडणूक निरीक्षक म्हणून एम गौतमी यांची नियुक्ती

निलाक्षी लोही मिसेस वेस्ट इंडिया २०२२ ची विजेती आहे

नाशिक, 18 जून : नीलाक्षी लोही (Nilakshi Lohi) यांच्या यशाने पुन्हा एकदा नाशिककरांची मान उंचावली आहे. कारण, त्यांनी मिसेस वेस्ट इंडिया 2022 च्या सौंदर्य स्पर्धेत विजेत्या आहेत. निलाक्षी या फोटोग्राफर आहेत. पण, मिसेस वेस्ट इंडियापर्यंतचा (Mrs. West India 2022) त्यांनी कसा प्रवास केला, ते आज आपण या स्पेशल रिपोर्टमधून जाणून घेऊया…

नीलाक्षी लोही यांच्या मागे घर-संसार असतानाही त्यांनी या स्पर्धेत विजेतेपद पटकावलं. मात्र, त्यांनी या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली. कारण, सौंदर्य स्पर्धेत सहभागी होणं म्हणजे, त्या मागे बरीच मेहनत असते. तुमच्या फिटनेसपासून तर तुमच्या शरीरातील लहान मोठ्या बदलांवरदेखील तुम्हाला बारकाईने नजर ठेवावी लागते. कारण, तुमचं सदृढ आणि दिमाखदार शरीरच तुमच्या या स्पर्धेच्या विजयाच कारण ठरतं.

वाचा : Success Story : IPS होऊनही मानलं नाही समाधान, लेडी ऑफिसरनं UPSC देत गाठलं शिखर

नीलाक्षी या स्पर्धेत सहभागी होण्याच्या अगोदरच काही महिने सराव करत होत्या. त्यात नियमित ग्राउंडवर जाऊन वॉर्म अप, फिटनेसचे वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम, रनिंग करत होत्या. यामुळे त्यांचं शरीर फिटनेस आणि रुबाबदार दिसायचं. याबरोबरच त्यांना फोटोग्राफीचा आणि व्हायोलिन वाजवण्याचादेखील छंद आहे. त्यांनी जंगलात जाऊन आतापर्यंत अनेक प्राणी पक्ष्यांचे सुंदर फोटो टिपले आहेत. फावल्या वेळेत त्या व्हायोलिन वाजवण्याचा छंदही जोपासत असतात.

दिवा पेजन्ट्स संस्थेने विवाहित महिलांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी पुण्यात ‘मिसेस वेस्ट इंडिया 2022’ या सौंदर्य स्पर्धेच आयोजन केलं होतं. जवळपास देशभरातून 33 महिला या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. या महिलांमध्ये झालेल्या सौंदर्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिल्व्हर कॅटॅगरीचे विजेतेपद निलाक्षी लोही यांनी विविध टास्क पूर्ण करत पटकावले. तसेच सौंदर्य आणि बुद्धिमत्तेचा संगम असलेल्या नीलाक्षी यांनी याच स्पर्धेत मिसेस कॉन्फिडांट 2022 सिल्व्हर कॅटॅगरीचा मुकुटही पटकावला.

वाचा : Success Story: “तू कलेक्टर आहेस का?” या एका वाक्यामुळे बदललं संपूर्ण आयुष्य; डॉक्टर झाली IAS ऑफिसर

नीलाक्षी लोही या मिसेस वेस्ट इंडिया 2022 सौंदर्य स्पर्धेच्या मानकरी ठरल्यामुळे त्यांच्या मित्र परिवाराकडूनदेखील त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होतोय. दिवा पेजन्ट्स संस्थेने विवाहित महिलांसाठी त्यांच्या गुणसामर्थ्याचा आविष्कार घडवण्याचा आणि इतरांना अशक्य वाटणारे साध्य करण्याच एक भक्कम व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यामुळे महिला वर्गात नव ऊर्जा निर्माण होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link

Leave a Comment

[adsforwp id="47"]