नाशिक, 7 जून : गरजू आणि होतकरू महिला, विद्यार्थिनींसाठी नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik Municipal Corporation) महिला व बालकल्याण विभाग आणि सिड इंडिया नॉलेज प्रा. लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने महिला स्वयंरोजगार (Self-Employment) मोफत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये Account-TALLY ERP-9 हा कोर्स शिकवला जाणार आहे.
दरवर्षी महापालिका अशा नवं नवीन प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करत असते. अशा अनेक महिला, विद्यार्थिनी असतात की, त्यांना शिकण्याची जिद्द असते. मात्र, घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे ते शिक्षण घेऊ शकत नाही किंवा असे कोर्सेस करू शकत नाही. हाच विचार लक्षात घेता महापालिका नेसिड इंडिया नॉलेज प्रा. लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण सुरू केले आहे.
गुगल मॅपवरून साभार…
कुठे शिकविला जाणार हा कोर्स?
सध्या डिजिटल युग आहे. प्रत्येक गोष्टी आपल्याला आता ऑनलाईन करावा लागतात. त्यामुळे Account-TALLY ERP-9 हा कोर्स शिकणे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे आपल्याला ऑनलाईन व्यवहार सहज करता येतो. त्यामुळे हा कोर्स महत्वपूर्ण ठरणार आहे. हा कोर्स शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या मेहेर हॉटेलशेजारी लेले कॉम्प्लेक्स, दुसरा मजला, अशोक स्तंभ येथे हा कोर्स शिकवला जाणार आहे.
विद्यार्थीनींची मर्यादा किती आहे?
या प्रशिक्षणामध्ये 2 बॅच असणार आहेत. एका बॅचमध्ये 30 महिला आणि मुली असतील. दुसऱ्या बॅचमध्येही 30 महिला किंवा विद्यार्थीनी असणार आहे. एकूण ६० महिलांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी हा ३ महिन्यांचा असणार आहे. दररोज 2 तास प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.
या कोर्सची वैशिष्ट्य काय?
1) पूर्णतः मोफत प्रशिक्षण
2) शासनमान्य प्रमाणपत्र
3) स्वयंरोजगार निर्मिती
या कोर्ससाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत?
1) जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला (यापैकी एक)
2) आधार कार्ड
3) रेशन कार्ड / घरपट्टी / लाईटबिल / भाडे करारनामा (यापैकी एक)
4) पासपोर्ट साईज 6 फोटो
5) उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न १ लाख ५० हजारांच्या आत असावे)
7) १० वी / १२ वी मार्कशीट
8) वयोमर्यादा 18 ते 45 वर्षे
वाचा : JOB ALERT: ‘या’ जिल्ह्यातील वनविभागात तब्बल 40,000 रुपये पगाराची नोकरी; पात्र असाल तर लगेच करा अर्ज
वरील सर्व कागदपत्रांचे झेरॉक्स प्रती ऑफिसच्या वरील पत्यावर जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर तुमच्या कागदपत्रांची छाननी करून तुम्हाला कोर्सबद्दल माहिती दिली जाईल. विशेष म्हणजे हे प्रशिक्षण ज्या महिलांनी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करतील, रोजगाराची संधीदेखील मिळणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.