ठळक बातम्या

आमदार राहुल कुल कुरकुभं एमआयडीसीतील “प्रदुषणाबाबत आक्रमक” कामगार मंत्री याच्या उपस्थितीतील बैठकीत केल्या विविध मागण्या, अधिकाऱ्यांना धरले धारेवर…श्री सिमेंट कंपनीला “शिवसंग्रामचे नेते वसंत साळुंखे” यांचा इशारा अन्यथा…कुरकुंभ पोलीस चौकीला स्वतंत्र पुर्णवेळ अधिकाऱ्याची गरज, गस्तीसाठी अतिरिक्त वाहनाची आवश्यकता… “पी एम किसान” योजनेचे पैसे बंद झालेत, थेट दौंडच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील ‘पी एम किसान कक्ष अधिकारी सोमनाथ देसाई’ यांच्याशी संपर्क साधा -9561474001मोबाईलवर “PM किसान” ची ‘APK फाईल’ आलीय तर बैंक खाते होवू शकते रिकामं, कृषी विभागाने केलंय हे महत्त्वाचे आवाहन – ही घ्या काळजी…

पोलिसाची नोकरी सोडून त्याने इस्त्राईली शेती केली अन् आता घेतोय टनात उत्पन्न – News18 लोकमत

नाशिक, 21 जून : आजकाल शेती करणं फारसं कोणालाही आवडत नाही. कारण, शेतीतून मिळणार उत्पन्न हे अनेकांना तुटपुंज वाटतं. शेतीत परवडत नाही, मालाला चांगला भाव मिळत नाही, अशी अनेकांची ओरड असते. अशा परिस्शिती असतानाही त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचवड येथील नितीन भोये (Farmer Nitin Bhoye in Nashik) या तरुणाने अनेकांना आदर्शवत अशी इस्त्राईली पद्धतीची आंब्याची शेती (israel mango farming) तयार केली आहे.

नितीन भोये हा 2014 मध्ये पोलीस दलात भरती झाला. मित्र सांगायचे की, नोकरी केली तर आपल्याला चांगला पैसा मिळतो. त्यामुळे नितीन हा नोकरीच्या मागे लागला. मात्र, पोलीस दलात भरती होऊनदेखील नितीनला नोकरी करावं असं वाटत नव्हतं. कारण, आपण शेतीत चांगल काही तरी करू शकतो म्हणून त्याचं मन त्याला सतावत होतं. त्याच मनही शेतीत लागत नव्हतं.

वाचा : Success Story : स्पर्धा परीक्षा सोडली! आता ‘हा’ पठ्ठ्या हाॅटेल व्यवसायात कमवतो महिना 80 हजार, पहा VIDEO

शेवटी नोकरी सोडून शेती करायचं नितीनने ठरवलं. मात्र, शेती करायची तर ती आधुनिक पद्धतीनेच करायची अशी नितीनची जिद्द होती. मित्राच्या मदतीने इस्त्राईल पद्धतीने आंब्याची शेती सुरू केली. नितीनने आपल्या मित्राच्या मदतीने सद्या 5 एकरवर विविध प्रजातीच्या आंब्याची लागवड केली आहे. त्यात मालिका, हिमसागर, गोवामानकूर, ऑस्टिन, लिली यासारख्या आंब्याच्या प्रजातींची लागवड केली आहे. दरवर्षी हे आंबे विदेशात एक्सपोर्ट करून नितीन चांगलं उत्पन्न कमवतो. तसेच आंब्यांबरोबर त्यांनी चिकू, नारळ या फळांचीही लागवड केली आहे.

हा तरुण शेती तर करतोच, मात्र याबरोबरच आपल्या आदिवासी भागातील शेतकऱ्यांना आंब्याच्या शेतीच प्रशिक्षण देखील देत असतो. यामुळे या भागातील अनेक शेतकऱ्यांना उत्पन्नाचा चांगला पर्याय मिळत आहे. त्यामुळे शेतीत परवडत नाही म्हणणंदेखील या तरुणाने चुकीचं ठरवलं आहे. आपण नवीन तंत्रज्ञान वापरून चांगल काम केलं तर नक्कीच शेतीत नफा मिळतो, हे नितीनने दाखवून दिलं आहे.

वाचा : Success Story: तब्बल 7.5 कोटींचं पॅकेज धुडकावून सुरू केलं कोचिंग; आज बनलीय देशातील युनिकॉर्न कंपनी

नितीनने इस्त्राईली शेतीच केली नाही तर, त्याचबरोबर त्यानं प्रशिक्षण केंद्रही सुरू केलं आहे. इस्त्राईल व जर्मन तंत्रज्ञानाची फळबाग शेती प्रशिक्षण केंद्र, असं त्याचं नाव आहे. चिंचवड, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक या पत्त्यावर त्याचं हे केंद्र आहे. त्याच्याशी 7875536465 किंवा 7666001068 या क्रमांवरही संपर्क करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link

Leave a Comment

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

[adsforwp id="47"]