ठळक बातम्या

कुरकुंभ पोलीस चौकीला स्वतंत्र पुर्णवेळ अधिकाऱ्याची गरज, गस्तीसाठी अतिरिक्त वाहनाची आवश्यकता… “पी एम किसान” योजनेचे पैसे बंद झालेत, थेट दौंडच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील ‘पी एम किसान कक्ष अधिकारी सोमनाथ देसाई’ यांच्याशी संपर्क साधा -9561474001मोबाईलवर “PM किसान” ची ‘APK फाईल’ आलीय तर बैंक खाते होवू शकते रिकामं, कृषी विभागाने केलंय हे महत्त्वाचे आवाहन – ही घ्या काळजी…पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…माफियांना ‘अधिकाऱ्यांचा’ आशीर्वाद, कुरकुंभ मंडळात कोट्यावधी रुपयांचा गौण खनिज बुडवून नियमबाह्य उत्खनन…

दौंडच्या कर्मयोगी सुभाष आण्णा कुल शिक्षक पतसंस्थेच्या सभापती शांताराम जगताप

पुणेरी टाइम्स टीम….                                                 कर्मयोगी सुभाष अण्णा कुल प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था दौंडच्या सभापतीपदी शांताराम जगताप यांची तर उपसभापती पदी शंकरराव भुजबळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दौंड तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या व इतर सर्व संघटनांच्या संचालकांनी शांताराम जगताप व भुजबळ यांचे नाव एकमताने सुचवल्याने ही निवड बिनविरोध करण्यात आली आहे. शांताराम जगताप हे शिक्षकांचे नेते असून शिक्षक आंदोलनात सक्रिय सहभागी असतात. शैक्षणिक चळवळीमधील व प्रशासकीय कामाचा जगताप यांचा दांडगा अनुभव हा शिक्षकांच्या विविध प्रश्नसंदर्भात वाचा फोडण्यास व न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाचा असतो. आणि त्यांच्या या दांडग्या अनुभवाच्या जोरावर प्रशासनाकडून शिक्षकांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यास जगताप नेहमी प्रयत्न करत असतात. शिक्षकांच्या आंदोलनात तसेच विविध मागण्या संदर्भात मोर्चा आंदोलने याबाबतची राज्यस्तरीय धुरा सांभाळणाऱ्या शिक्षक नेतृत्वामधील जगताप हे यशस्वी शिक्षक नेते आहेत. त्यामुळे जगताप यांची निवड ही सार्थ ठरणार असून यांचा संस्थेस फायदा होणार आहे यांत शंका नाही, जगताप यांच्या निवडीनंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा व सत्कार समारंभ आयोजित केले आहेत…

दौंड तालुक्याची प्राथमिक शिक्षकांची अर्थवाहिनी असणारी संस्था प्रगतीपथावर नेताना सभासद हीत आणि संस्थेची प्रगती डोळ्यासमोर ठेवून काम करेल हेच अभिवचन माझ्यासह सर्व संचालक मंडळाच्या वतीने या निमित्ताने आपणा सर्वांना देतो. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे आणि शिक्षक संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सर्वच संघटनांचे, संचालकांचे देखील मनापासून आभार मानतो. असे यावेळी शांताराम जगताप यांनी सांगितले

Leave a Comment

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

[adsforwp id="47"]