पुणेरी टाइम्स टीम…
हातवळण येथे जि. प शाळेच्या वतीने प्रांगणात बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याचे उद्घाटन हातवळण गावचे सरपंच श्री योगेश फडके, उपसरपंच श्री अनिल गवळी यांनी सर्व ग्रामस्थ पालकांच्या उपस्थितीत केले.
विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवहार ज्ञान अवगत व्हावे यासाठी या बाल आनंद मेळाव्याचे आयोजन केले असल्याचे मुख्याध्यापिका सौ. छाया साळवे यांनी सांगितले.या बाजारामध्ये चिमुकल्यांनी आपापल्या शेतातील भाजीपाला, फळे, पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्य तसेच विविध खाण्याच्या पदार्थांचे स्टॉल लावले होते. जवळपास 25 हजार रुपयांची उलाढाल या बाजारात करण्यात आली.
या मेळाव्याचे आयोजन शाळेतील शिक्षक श्री घोरपडे सर, श्री साळुंके सर, श्री भालेराव सर, सौ साळुंके छाया व सौ गदादे शितल यांनी केले. या कामी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री प्रमोद गांधले, श्री मंगेश फडके, श्री प्रवीण फडके सौ पूजा माने,सौ रूपाली फडके, सौ चैताली बनकर व इतर सर्व सदस्य यांचे सहकार्य मिळाले. यावेळी श्री बापू फडके, श्री सागर फडके, श्री सचिन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते..