पुणेरी टाइम्स टीम….
अबॅकस राज्यस्तरीय परीक्षा -2023 मोठ्या उत्साहात
संस्कार इंग्लिश मीडियम स्कूल दौंड येथे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. या परीक्षेसाठी राज्याभरातून अनेक मुलांनी सहभाग घेतला होता. या परीक्षेचे नियोजन व आयोजन ऑल इंडिया अबॅकस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक श्री.सागर गावडे यांनी केले होते. यामध्ये जामखेड येथील सक्सेस अबॅकस अकॅडमी, श्रीगोंदा येथील स्वामी समर्थ अबॅकस अकॅडमी, पुणे येथील लोटस अबॅकस अकॅडमी, दौंड येथील सक्सेस अबॅकस अकॅडमी तसेच समर्थ अबॅकस अकॅडमी व श्रीनाथ अबॅकस अकॅडमी गोपाळवाडी, दौंड येथील अनेक विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने सहभाग घेतला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ७ चे दौंड येथील सहाय्यक समादेशक माननीय श्री.सानप साहेब उपस्थित होते, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १ पुणे येथील पोलीस उपनिरीक्षक देसाई साहेब, दौंड येथील नगरसेविका कुलथे मॅडम, गोपाळवाडी येथील श्रीनाथ म्हस्कोबा सोसायटीचे चेअरमन आबासाहेब दोरड, गोपाळवाडी ग्रामपंचायत सरपंच श्री.जयसिंग दरेकर, गोपाळवाडी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच ज्ञानदेव निवृत्ती होले, श्री.आजिनाथ बबन लव्हे, डॉक्टर श्री.राजेश दाते, रोटरी क्लबचे सदस्य श्री.अमीर शेख, आबासाहेब जगदाळे पाटील, संस्कार इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष श्री जयवंत पवार, तसेच इतर पदाधिकारी, पालक विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.रवी पवार यांनी केले.
यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी पाच मिनिटांमध्ये 60 गणितीय प्रश्न सोडवण्याचा विक्रम पार केला. विविध शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला प्रामुख्याने सौ.चांदणी होले, सौ.सुजाता पाचपुते, सौ.वैष्णवी चिंचकर,सौ.अनुष्का मोरे, सौ. कदम मॅडम, सौ.गावडे मॅडम, सौ.ढगे मॅडम, सौ.साळुंके मॅडम यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
तसेच विद्यार्थ्यांना अबॅकस मधील चॅम्पियनशिप पुरस्कार, देऊन बक्षिसे, ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले. विविध मान्यवरांनी, पालकांनी तसेच विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. .
ठळक बातम्या
कुरकुंभ MIDC परिसरात ‘प्लेटची’ चोरी करणाऱ्या ‘चार चोरट्यानां’ दौंड पोलीसांनी कडून बेड्या, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त- सपोनि नागनाथ पाटील यांची माहिती……दौंड मध्ये’ रमेश थोरातां’साठी “शरद पवार” कोणता डाव टाकणार? महाविकास आघाडीची आज वरवंडला जाहीर सांगता सभा…दौंडच्या राजकारणात नवा ट्विस्ट येणार! खासदार ‘निलेश लंके’ यांचे आव्हान आमदार ‘राहुल कुल’ यांनी स्विकारले, विरोधकांच्या “भूमिकेकडे” तालुक्याचे लक्ष…?निवडणूकीच्या धामधुमीत ‘आमदार राहुल कुलांकडून’ आरोग्य सेवेचे व्रत सुरूच, महिनाभरात “वीसहुन” अधिक रुग्णांना मदत…दौंड विधानसभा मतदारसंघाकरीता निवडणूक निरीक्षक म्हणून एम गौतमी यांची नियुक्ती