पुणेरी टाइम्स टीम…
पुणे येथील अल्पबचत भवन येथे नुकताच गुणवंत शिक्षक जिल्हा पुरस्काराचा वितरण सोहळा संपन्न झाला. या पुरस्कारासाठी दौंड तालुक्यातील जिरेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आदर्श व उपक्रमशील शिक्षिका श्रीम.अनिता काळे यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे. त्यानंतर जिरेगाव ग्रामस्थांच्या वतीने पुरस्कारार्थी शिक्षिका यांचे अभिनंदन करीत सत्कार करण्यात आला आहे.
सोमवार ( ता. १८) रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिरेगाव, शाळा व्यवस्थापन समिती जिरेगाव, ग्रामपंचायत जिरेगाव, ग्रामस्थ, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी या सर्वांच्या वतीने शिक्षिका अनिता काळे यांचे पुरस्कारा मिळालेबद्दल अभिनंदन व सत्कार करण्यात आला आहे.
या प्रसंगी जिरेगाव ग्रामपंचायत चे सरपंच भरत खोमणे, शाळेचे मुख्याध्यापक शांताराम जगताप, शाळेच्या उपशिक्षिका शोभा , गायकवाड, स्वाती जराड,
श्रीमती अनिता ज्ञानदेव काळे, शाळेचे विध्यार्थी वर्ग तसेच पालक वर्ग आदी उपस्थित होते.
ठळक बातम्या
कुरकुंभ MIDC परिसरात ‘प्लेटची’ चोरी करणाऱ्या ‘चार चोरट्यानां’ दौंड पोलीसांनी कडून बेड्या, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त- सपोनि नागनाथ पाटील यांची माहिती……दौंड मध्ये’ रमेश थोरातां’साठी “शरद पवार” कोणता डाव टाकणार? महाविकास आघाडीची आज वरवंडला जाहीर सांगता सभा…दौंडच्या राजकारणात नवा ट्विस्ट येणार! खासदार ‘निलेश लंके’ यांचे आव्हान आमदार ‘राहुल कुल’ यांनी स्विकारले, विरोधकांच्या “भूमिकेकडे” तालुक्याचे लक्ष…?निवडणूकीच्या धामधुमीत ‘आमदार राहुल कुलांकडून’ आरोग्य सेवेचे व्रत सुरूच, महिनाभरात “वीसहुन” अधिक रुग्णांना मदत…दौंड विधानसभा मतदारसंघाकरीता निवडणूक निरीक्षक म्हणून एम गौतमी यांची नियुक्ती