पुणेरी टाइम्स टीम
दिनांक 9 सप्टेंबर 2023 रोजी अल्पबचत भवन पुणे येथे गुणवंत शिक्षक जिल्हा पुरस्काराच्या वितरण सोहळ्या संपन्न झाला आहे, या पुरस्कार सोहळ्यात दौंड तालुक्यातील हातवळण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या उपशिक्षिका शितल अशोक गदादे (शेंडे) यांना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजित दादा पवार यांच्या हस्ते गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पालकमंत्री मा.श्री. चंद्रकांत ् पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.रमेश चव्हाण साहेब, पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीम.संध्या गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये गुणवंत शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले
सौ शितल गदादे(शेंडे) या दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हातवळण येथे ज्ञानदानाचे कार्य करत आहेत.
विविध नाविन्यपूर्ण उपक्रम आणि शिष्यवृत्ती मार्गदर्शन यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर त्यांनी भर दिला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री सागर फडके व हातवळण शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सचिन शिंदे व सदस्य तसेच मुख्याध्यापिका साळवे छाया व शिक्षक वृंद यांनी यावेळी पुरस्कारार्थी शितल गदादे – शेंडे यांचे अभिनंदन केले.