ठळक बातम्या

कुरकुंभ पोलीस चौकीला स्वतंत्र पुर्णवेळ अधिकाऱ्याची गरज, गस्तीसाठी अतिरिक्त वाहनाची आवश्यकता… “पी एम किसान” योजनेचे पैसे बंद झालेत, थेट दौंडच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील ‘पी एम किसान कक्ष अधिकारी सोमनाथ देसाई’ यांच्याशी संपर्क साधा -9561474001मोबाईलवर “PM किसान” ची ‘APK फाईल’ आलीय तर बैंक खाते होवू शकते रिकामं, कृषी विभागाने केलंय हे महत्त्वाचे आवाहन – ही घ्या काळजी…पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…माफियांना ‘अधिकाऱ्यांचा’ आशीर्वाद, कुरकुंभ मंडळात कोट्यावधी रुपयांचा गौण खनिज बुडवून नियमबाह्य उत्खनन…

अहमदनगरची प्रणिता झाली राज्य सरकारच्या शिवछत्रपती क्रिडा पुरस्काराची मानकरी, ३१ पदकांची कमाई करीत नेपाळ, थायलंड, तुर्कस्तान व दक्षिण कोरीया देशात केले भारताचे प्रतिनिधित्व

पुणेरी टाइम्स टीम…

अहमदनगर मधील संगमनेरची सुकन्या प्रणिता प्रफुल्ल सोमण हिने भारताकडून अनेक देशांमध्ये जाऊन सायकलिंग मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे, त्यामध्ये नेत्रदीपक कामगिरी बजावली असून उज्ज्वल यश संपादन केले आहे…

नुकताच महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला आहे, शासनाच्या वतीने देण्यात येणारा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारची प्रणिता मानकरी ठरली आहे.
प्रणिता सोमण पुरस्कारासह...या पुरस्काराचे स्वरूप पुरस्कारामध्ये प्रमाणपत्र, मानचिन्ह, शासनाचे ओळखपत्र व १लाख रुपये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते देण्यात आले, यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, दिलीप वळसे – पाटील, गिरीश महाजन आदी मंत्रीगणउपस्थित होते.

प्रणिता प्रफुल्ल सोमण ही संगमनेर येथील आदर्श विद्यालय,  सारडा काॅलेज येथील विद्यार्थीनी आहे, अहमदनगर व संगमनेर येथे प्रशिक्षणाचे धडे घेत प्रणिताने यशाची शिखरे सर केली आहेत. प्रणिताचे आई-वडील पेशाने डॉक्टर असून मुलगी प्रणिताच्या या कामगिरीमुळे त्यांची समाजामध्ये मान  आणखी उंचावली आहे.

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

अहमदनगर नगर येथे प्रशिक्षक सुमेर सर यांच्या मार्गदर्शनाखाली, तर प्रशिक्षक मितेन ठक्कर यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर येथे सराव करीत प्रणिताने लागोपाठ ३वर्ष (champion MTB) मध्ये व भारताची उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड झाली आहे…
भारताकडून नेपाळ, थायलंड, तुर्कस्तान व द.कोरीया मध्ये खेळण्यासाठी प्रणिता गेली आहे. प्रणिताच्या या सर्व यशामागे तिची मेहनत, जिद्द, चिकाटी, आणि प्रशिक्षक व कुटुंबीय आई-वडिलांचे मोठे योगदान असल्याचे प्रणिता माध्यमांशी बोलताना सांगितले..

Leave a Comment

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

[adsforwp id="47"]