ठळक बातम्या

क्रीडामंत्री ‘दत्तात्रय भरणे’ गोविंदाच्या सुरक्षितेसाठी धावले, इंदापूरच्या आठ दहीहंडी संघांना “मॅट” उपलब्ध करून देणार…“सायबर गुन्हेगारी” रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलावीत – आमदार ‘राहुल कुल’ यांची विधानसभेत मागणीदौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…मलठणच्या उपसरपंचदी आमदार ‘राहुल कुल’ गटाच्या “सोनाली जगताप” बिनविरोध…राज्याच्या राजकारणात राहुल कुलांचा यशस्वी डाव, काँग्रेस-राष्ट्रवादीतील असंतोषाचा भाजपला फायदा; कुल यांच्या नेतृत्वात राजकारणातील मोठे चेहरे भाजपात…

वाचन संस्कृती टिकविण्यासाठी मुंबईत परिसंवाद, साहित्यिक दशरथ यादव मुख्य “अतिथी” यशवंतराव चव्हाण सेंटरचा पुढाकार

पुणेरी टाइम्स – पुणे
स्वाभिमानी आणि सुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी वाचन महत्त्वाचे असून, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने राज्यभर वाचन चळवळीला गती देण्यासाठी मुंबईत मंगळवार दि.२९ ऑगस्ट रोजी परिसंवादांचे आयोजन करण्यात आले असून, ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

वाचकाभिमुख ग्रंथालय ही काळाची गरज व डिजिटल माध्यमाचा वाचनावर पडलेला प्रभाव या विषयावर परिसंवाद व चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.सिसिलिया कार्व्हालो, राज्य ग्रंथालय उपसंचालक शशिकांत काकड मार्गदर्शन करणार आहेत. चर्चासत्रात रसिकांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ.सिद्धी जगदाळे, साहित्यिक किरण येले उत्तरे देणार आहेत.


एकदिवसीय परिसंवादांचे निमंत्रक खासदार सुप्रिया सुळे आहेत. ग्रंथालय संसाधन व ज्ञानोपासक अनिल पाझारे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिप्ती नाखले, सरचिटणीस हेमंत टकले हे परिसंवादांचे व्यवस्थापन करीत आहेत. वाचकाभिमुख ग्रंथालय ही काळाची गरज असून, डिजिटल माध्यमाचा वाचनावर प्रभाव पडला आहे. वाचन संस्कृतीचे महत्व व विकास युवा पिढीत रुजविण्याची गरज आहे. वाचनातून प्रेरणा निर्माण होते, आत्मविश्वास वाढतो आणि ज्ञानाची वृद्धी होते. जातीयता, विषमता, अंधश्रद्धा, गुलामी, अस्थिरता, धर्मांधता नष्ट करून मानवतावादी समाज उभा करण्यासाठी वाचन चळवळ सक्षम करणे आवश्यक आहे. सध्याचा काळ अस्वस्थ करणारा असून, लोकशाही आणि संविधान धोक्यात आले आहे. हुकूमशाहीची बीजे रुजत असताना व्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. प्रसार माध्यमे सत्तेच्या अंकीत आहेत. कवी, लेखक निर्भीड लेखन करू शकत नाही. त्यांच्यावर दबाव आणला जातो. यामुळे समृद्ध समाज निर्माण होऊ शकत नाही. त्यासाठी वाचन संस्कृती बळकट करुन लेखणीची तलवार करावी लागेल तरच धाक निर्माण होईल अशी भावना व्यक्त होताना दिसते.

साहित्यिकांना आवाहन
मराठी भाषेचा प्रचार, प्रसार करीत असताना इतिहासाचा जुना ठेवा जतन करणे आवश्यक आहे. वाचनाने मानवाच्या कल्याणासाठीचे मार्ग सापडतात. वाचनाने क्रांती होते. वाचन संस्कृतीचा जागर करण्यासाठी कवी, लेखक, पत्रकार, कलावंत, शाहीर यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

[adsforwp id="47"]