पुणेरी टाइम्स दौंड – पुणे
राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सातच्या समादेशक राजलक्ष्मी शिवणकर यांनी संचलनाची स्वीकारली मानवंदना…
महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये ४४७ महिला सुरक्षा रक्षक रक्षणाकरिता सज्ज झाल्या असून नुकताच दौंड तालुक्यातील नानविज पोलीस प्रशिक्षण केंद्रांत या सुरक्षारक्षणाकांचा दीक्षांत सोहळा पार पडला आहे नानविज पोलीस प्रशिक्षण केंद्र मध्ये पहिल्यांदाच महिलांचे प्रशिक्षण सत्र पार पडले आहे. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सातच्या समादेशक राजलक्ष्मी शिवणकर उपस्थित होत्या. यावेळी सर्व नवसुरक्षा रक्षकांना आता आपण महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये सहभागी होणार आहात, आपल्या कर्तव्यातुन सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यापुढे तुमच्याकडे मदतीची अपेक्षा घेवून अनेकजण येणार आहेत. त्यांच्या अपेक्षा पुर्तीतून तुमच्या कर्तव्याचे खरे दर्शन होणार आहे. आपल्या उद्देशापासून आपण एक कणभरही दूर जावू नका. सुरक्षा रक्षकाच्या अंगी शिस्त मेहनत त्याग व धाडस हे गुण असलेच पाहिजेत. असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सातच्या समादेशक राजलक्ष्मी शिवणकर यांनी केले.
महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाच्या महिला सुरक्षा रक्षकांचा दिक्षांत संचलन सोहळा नानवीज येथील राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्राच्या कवायत मैदानामध्ये शनिवारी सकाळी साडेसात वाजता मोठ्या दिमाखात पार पडला.
राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सातच्या समादेशक राजलक्ष्मी शिवणकर यांनी संचलनाची मानवंदना स्वीकारली यावेळी प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य रामचंद्र घेणे व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. राज्य राखीव पोलीस प्रशिक्षण केंद्र नानविज येथे महिलांचे प्रशिक्षण सत्र पहिल्यांदाच पार पडले.
या प्रशिक्षण सत्रामध्ये महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या ४४७ महिला सुरक्षा रक्षकांनी प्रशिक्षण घेतले आहे. यावेळी पुढे बोलताना शिवणकर म्हणाल्या खांदयाला खांदा लावून लढण्याची तयारी पाहिजे. देशाची सुरक्षितता व कायदा सुव्यस्थेसाठी झोकून देण्याची तयारी सुरक्षा रक्षकांनी नेहमी ठेवली पाहिजे. यासाठी तुमच्या पाठीशी महाराष्ट्र सुरक्षा बल पूर्ण ताकदीने उभे आहे. महाराष्ट्र सुरक्षा बलाची गुणवत्ता व दर्जा अधिक वाढविण्याची जबाबदारी महाराष्ट्र सुरक्षा बलात नव्याने दाखल होणाऱ्या तुमच्यासारख्या सुरक्षा रक्षकांची आहे. राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र, नानवीज ही पोलीस प्रशिक्षण क्षेत्रातील एक नावाजलेली संस्था आहे. नानवीज पोलीस प्रशिक्षण केंद्राचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर भारत देशाला माहित आहे. आपण या प्रशिक्षण केंद्रातुन प्रशिक्षण पुर्ण केल्याचा फायदा भविष्यात कर्तव्य बजावताना आपणास होणार आहे. आजच्या संचलनाप्रमाणेच आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी अशीच कामगिरी कराल असा मला विश्वास वाटतो. महाराष्ट्र सुरक्षा बलाची उंची आपण आणखी वाढविली पहिजे. महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या कसोटीत आपण उतराल अशी आशा बाळगते असे त्या म्हणाल्या. सदर प्रशिक्षण सत्रामध्ये प्रशिक्षणार्थी यांना कवायत, शस्त्रांसह विविध कायद्यांचे प्रशिक्षण दिले आहे. आजच्या दिक्षांत संचलनाचे परेड कमांडर म्हणुन चेस्ट क्र. ११०५ ऐश्वर्या पवार यांनी नेतृत्व केले. आंतरवर्ग प्रशिक्षणामध्ये चेस्ट क्र. ११४९ आरती लव्हटे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तसेच बाह्यवर्ग प्रशिक्षण प्रथम क्रमांक चेस्ट क्र. १३२६ निता वर्मा यांनी मिळविला. राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र, नानवीज ही पोलीस प्रशिक्षण क्षेत्रातील एक नावाजलेलली संस्था आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये पोलीस दल व राज्य राखीव पोलीस दलातील जवानांना उत्कृष्ट प्रशिक्षण दिले जाते. रारापोबल प्रशिक्षण केंद्र, नानवीज येथे महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाचे सुरक्षा रक्षकांची सत्र क्र ६१-डी हे दिनांक १३/०७/२०२३ पासुन प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले होते. प्रशिक्षण केंद्रामध्ये महामंडळाच्या ४४७ महिला सुरक्षा रक्षकांना प्राचार्य, रा.बा.केंडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व प्रशिक्षक यांनी उत्कृष्ट प्रशिक्षण दिले आहे. महाराष्ट्र राज्य सरकार व केंद्र सरकार यांची सर्व कार्यालये, उपक्रम यांना उत्तम संरक्षण व सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने तसेच मुंबई शहरावर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर शहरात तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी एक सुरक्षा रक्षक दल असावे या विचारातुन महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अधिनियम अंतर्गत महाराष्ट्र सुरक्षा बलाची स्थापना एप्रिल २०१० मध्ये महाराष्ट्र राज्य सिक्युरीटी कॉर्पोरेशन ने केली. एम एस एफ ही एक महाराष्ट्र राज्यामधील गर्व्हमेंट सिक्युरिटी एजन्सी आहे. एम एस एफ चे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. अवघ्या २५० जवानांच्या साथीने सुरु झालेल्या या दलामध्ये आज १० हजार जवान कार्यरत आहेत. राज्यातील विविध शहरांमध्ये मोनो रेल्वे, मेट्रो रेल्वे, रिजर्व बँक, विविध मंदिरे, इतर संवेदनशिल ठिकाणी बंदोबस्त करिता तैनात करण्यात येते. उपप्राचार्य बी. पी. जाधव यांनी कार्यकमास हजर प्रमुख अतिथी व उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.