सरकारचा नाकर्तेपणा उघड… तलाठी परीक्षेत यंत्रनेकडून मोठा घोटाळा…
पुणेरी टाइम्स – पुणे
सरकारचा नाकर्तेपणा उघड झाला आहे .तलाठी भरती परीक्षेत यंत्रनेकडून सर्व्हर डाऊन चा मोठा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे राज्यात हजारो विद्यार्थी या परीक्षेपासून वंचित राहिले आहेत.
.
सरकारच्या मढ्यावर हजाराने रुपये घातले, असुनही यंत्रणा कुचकामी ठरत असेल तर यास जबाबदार कोण असा सवाल परिक्षार्थी विद्यार्थ्यांना पडत आहे.
सरकारच्या या असल्या धोरणांमुळे तरुणांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार घडत आहे त्यामुळे यंत्रणा व सरकारच्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे यांनी खडे बोल सुनावले आहेत.
शेतकऱ्यांच्या पोराकडून एका तलाठीच्या परीक्षेसाठी एक हजार रुपये वसूल केले गेले आणि जर परीक्षेत खेळखंडोबा असेल तर याला जबाबदार कोण यांस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे असा सवालही संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे यांनी केला आहे.