By Puneritimes Team -संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर खराडेवाडी नजीक शिर्सुफळ फाट्यावर दिनांक १० रोजी रात्री १०:३० दरम्यान भीषण अपघात घडला आहे… या अपघाताची तीव्रता एवढी भयानक होती की, या अपघातातील चारचाकी वाहन टाटा टिगोर हे दौंड कडून बारामतीच्या दिशेने जात होते, सदरील वाहनांची गती १२० ते १५० किमी जवळपास होती. चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदरील चारचाकी वाहन हे महामार्ग दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने बारामतीहुन दौंड च्या दिशेने कुरकुभंच्या औद्योगिक वसाहतीत कामासाठी जाणाऱ्या दुचाकीवर जोरदार आदळले. व चारचाकी वाहन पलटी झाले. तदनंतर अपघात ग्रस्त दोन्ही वाहने ही अपघाताच्या जागेपासून जवळपास तीनशे फुट महामार्गावरुन फरफटत जावून लोखंडी संरक्षित कठड्यावर आदळले. अपघातात दुचाकीस्वाराचे धडापासून शीर वेगळे, तसेच शरीराचे शेकडो तुकडे महामार्गावर पडले होते तर चारचाकी स्वाराचाही जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित स्थानिकांनी दिली.
