पुणेरी टाइम्स टीम – इंदापूर
इंदापूर शहरातील गोविंदा पथकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शहरातील दहीहंडी उत्सवाची पूर्व तयारी येत्या काही दिवसांत सुरु होत आहे., गोविंदांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कडून नुकताच घेण्यात आला आहे. इंदापूर शहराच्या एका खाजगी कार्यक्रमात क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे आले होते., यावेळी इंदापूरातील दहीहंडी मार्गदर्शक रमेश शिंदे यांनी दहीहंडी संघांच्या वतीने एक महत्वाची मागणी व्यासपीठावरून मांडली. “दहीहंडी चा सराव करताना अनेक वेळा अपघात होतात. गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक संघाला मॅट उपलब्ध करून दिला पाहिजे,” अशी ठाम भूमिका शिंदे यांनी व्यक्त केली.
या मागणीची गांभीर्याने दखल घेत क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्वरित पुढाकार घेतला. कार्यक्रमातच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून आठही दहीहंडी पथकांना आवश्यकतेनुसार मॅट उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. या निर्णयामुळे इंदापूरमधील सर्व आठ दहीहंडी संघांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गोविंदाच्या सुरक्षिततेसाठी उचललेले हे पाऊल म्हणजे एक सकारात्मक बदलाची सुरुवात मानली जात आहे.
दहीहंडी साजरी करताना उत्साह, परंपरा आणि सुरक्षा यांचा समतोल राखणारे हे उदाहरण इतर ठिकाणांसाठीही प्रेरणादायी ठरावे, अशी अपेक्षा शहरातील नागरीक व्यक्त होत आहे.