पुणेरी टाइम्स टीम – आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या महाराष्ट्र ‘राज्यप्रदेश उपाध्यक्ष’ पदी पुणे जिल्ह्यातील दौंडचे उद्योजक ‘संजय जाधव’ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या इतिहास आघाडीच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांची युद्धकला, ऐतिहासिक वास्तुंची माहिती, गडकिल्ले संवर्धन या सर्व बाबींवर तरुणांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी प्रयत्नशील आहे याच धर्तीवर आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या इतिहास आघाडी महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष पदी संजय जाधव यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे नियुक्ती पत्र आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ कृषीराज टकले पाटील यांनी नुकतेच दिले आहे. संजय जाधव हे अनेक संस्थावर, पदावर कार्यरत आहेत व कामकाज केले आहे. यावेळी दिपक फाळके यांनी नियुक्ती झाल्याबद्दल म्हणाले की, आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ ऐतिहासिक संपत्ती जोपासणारी संघटना आहे. राजमाता जिजाऊ माँ साहेब व छत्रपती शिवराय, छत्रपती शंभुराजे यांच्या इतिहासाची तरुणांना जाणिव करुन देण्यासाठी संघटना प्रयत्न करत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सुध्दा संघटन आवाज उठवत आहे. या कार्याला बळ यावं म्हणून संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करू असे उपस्थितांना आशवस्त केले.
आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या इतिहास आाघाडी मध्य प्रदेश उपाध्यक्ष पदी संजय जाधव यांची नियुक्ती झाल्याबद्दल आंतरराष्ट्रीय अध्यक्ष एम के बी एन आर सागर, आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष रवी प्रताप पटेल, आंतरराष्ट्रीय सचिव चैतन्य रावल, आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष हेमंत सरकार, आंतरराष्ट्रीय इतिहास आघाडी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष व्याख्याते रवींद्र जगदाळे, आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष अमरसिंह जाधवराव, आंतरराष्ट्रीय सचिव उज्वल सिंह गायकवाड, आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष इंद्रजीत घोरपडे,राष्ट्रीय कार्याध्यक्ष निलेश धुमाळ पाटील, महिला आघाडी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष किरण शेखावत, महिला आघाडी भारत राष्ट्रीय अध्यक्ष कोकीळ पवार, राष्ट्रीय उपाध्यक्ष महिला आघाडी शिवशंभू प्रिया जांभळे, इतिहास आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेंद्र निंबाळकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष दिनेश भैय्या कुर्मी आदिंनी जाधव यांचे स्वागत केले आहे.
