पुणेरी टाइम्स टीम…
महाराष्ट्र विधानमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी दौंडचे आमदार ॲड. राहुल कुल यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी नुकताच विधानभवन, मुंबई येथे या पदाचा अधिकृतपणे पदभार स्वीकारला. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी आमदार अॅड राहुल कुल यांचा सत्कार करून अभिनंदन केले.
आमदार ॲड कुल यांचे वडील दिवंगत आमदार कै. सुभाष अण्णा कुल यांनी यापूर्वी महाराष्ट्र विधानसभेच्या आश्वासन समितीचे अध्यक्षपद भूषवले होते. त्याच पद्धतीने, आमदार ॲड. कुल यांना मागील कालावधीत पहिल्यांदा विधानसभेच्या हक्कभंग समितीच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली होती. पुन्हा दुसऱ्यांदा महाराष्ट्र विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे. ही संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुलजी नार्वेकर यांचे मनःपूर्वक आभार मानतो असे आमदार ॲड. कुल यांनी म्हटले आहे. तसेच राज्यातील सार्वजनिक उपक्रमांचे कार्य अधिक पारदर्शक, परिणामकारक आणि जनहित केंद्रित राहील, यासाठी प्रयत्नशील राहणार असून, सर्व सदस्यांच्या सहकार्याने कायद्याच्या चौकटीत राहून पारदर्शक व निष्कलंक पद्धतीने समितीचे कार्य चालवले जाईल, अशी ग्वाही दिली.
यावेळी राज्याचे महालेखाकार (वाणिज्यिक) श्री. दत्तप्रसाद शिरसाट, आमदार मिलिंद नार्वेकर, वरुण सरदेसाई, निलेश राणे, निरंजन डावखरे, धर्मराव बाबा अत्राम, अभिजित वंजारी, विलास भुमरे, सुलभा खोडके, विधीमंडळ सचिवालय समितीचे अवर सचिव श्री. आशिष जावळे व इतर अधिकारी उपस्थित होते.