‘परिचारिका’ म्हणजे “आरोग्य सेवेचा” कणा… – मीनाक्षी शिंदे – मुदगल राज्य अध्यक्ष जिल्हा परिषद नर्सेस संघटना, महाराष्ट्र राज्य

पुणेरी टाइम्स टीम…पुणे सन 1854 साली झालेल्या क्रिमिलियन युद्धातील जखमी सैनिकावर हातात दिवा घेऊन रात्री निस्वार्थीपणाने उपचार करणाऱ्या फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या सत्कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा दिवस म्हणजेच त्यांचा जन्मदिवस 12 मे हा जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. 12 मे 1820 साली जन्म घेतलेल्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल या आधुनिक शुश्रूषा शास्त्राच्या जनक- संस्थापिका होत्या… हा दिवस आरोग्यसेवा क्षेत्रातील परिचारिकांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी तसेच रुग्णसेवेच्या सत्कार्याचा सन्मान होऊन इतरांना त्यापासून प्रेरणा मिळण्यासाठी साजरा केला जातो. “आरोग्य सेवा आणि या प्रणालीचा मजबूत कणखर कणा म्हणजे परिचारिका” होय.

इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ नर्सेस यांनी “आमच्या परिचारिका आमचे भविष्य परिचारिकांची काळजी घेणे म्हणजे अर्थव्यवस्था मजबूत करणे” ही थीम सन 2025 साठी जागतिक परिचारिका दिनासाठी दिली आहे.  नर्स म्हणून आम्हाला या कार्याचा आम्हाला अभिमान, स्वाभिमान, आणि गर्व आहे, कारण तळागाळातील एक सामान्य माणूस ते अधिकारी पदाधिकारी पासून देशाचे सर्वोच्च स्थान भूषवणारे कोणतेही व्यक्तिमत्व असो त्यांना लसीकरण करणारी एकमेव व्यक्ती आहे ती म्हणजे नर्स…

देवी सारख्या आजाराचे समूळ उच्चाटन असो पोलिओला देशातून हद्दपार करणे असो किंवा कोविड सारख्या जागतिक महामारी पेशंटची काळजी घेणारी व्यक्ती आणि या कोविड मधून नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी लसीकरण करणारी व्यक्ती म्हणजे नर्स. पण याच देवदूतांच्या कार्याचा विसर आज समाज-शासन- प्रशासन यांना पडला आहे त्यामुळे खालील मुद्द्यावर विचार होणे अपेक्षित आहे…

24×7 कामाची बांधिलकी – यातून जिल्हा परिषद अंतर्गत नर्सेसना स्वतःसाठी कुटुंबासाठी वेळ द्यायला वेळ मिळत नाही त्यांच्या सामाजिक- सांस्कृतिक-वैयक्तिक-कौटुंबिक विकासाला खीळ बसत आहे

कार्याचे अवमूल्यन आणि मानवी हक्कांची हेटाळणी* : नोकरीची बांधिलकी म्हणून 24×7 काम करून घेणे, आणि सेल्फी अटेंडन्स तसेच बायोमेट्रिक अटेंडन्स आणून 24×7 केलेल्या कामाचे अवमूल्यन करून ते आठ तास दाखवणे शारीरिक आणि मानसिक पिळवणूक करून घेणे. 40ते 45% रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार तर दिला जातोच परंतु स्वतःच्या कामासोबत अतिरिक्त कामाचे अतिरिक्त काम टार्गेट स्वरूपात पूर्ण करून देण्याची जबाबदारी दिली जाते. सोबतच अतिरिक्त कामाचे टार्गेट पूर्ण झाल्यास न झाल्यास कायद्याचा बडगा आणि शासकीय कार्यवाही आहेच. त्यामुळे शारीरिक मानसिक पिळवणूक होतच आहे, मानव हक्क अधिकार यांची हेटाळणी होत आहे. कुटुंबासाठी गरज असेल तेव्हा रजा सुद्धा लवकर मिळत नाहीत रजेवर असल्यास ते ऑनलाईन काम आहे ते पूर्ण करणे बंधनकारक असते. म्हणजेच तिच्या कामासाठी पर्यायी मनुष्यबळ उपलब्ध होत नाही कारण सध्या असलेले 40 ते 45 टक्के रिक्त पदे तिप्पट काम करू तिप्पट काम तिप्पट कार्यक्षमतेने करताना नर्सेस ची होणारी शारीरिक मानसिक हानी यामुळे याच नर्सेस मानसिक आजाराला बळी पडत आहेत. जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत 24-24 तास राबवून घेताना तिच्या मानव हक्काची हेटाळणी मानसिक कुचंबणा बऱ्याच अंशी होत आहे. या अतिरिक्त कामाचा कसलाही आर्थिक मोबदला किंबहुना शाब्दिक प्रशंसा सुद्धा मिळत नाही. उलट काम कमी असल्यास कायद्याचा बडगा मात्र एक स्त्री कर्मचारी म्हणून लगेच उचलला जातो

मूलभूत हक्काची पायमल्ली, 125 ते 300 स्क्वे. फु. क्षेत्रफळ असलेल्या गळक्या,पडक्या,स्मशान भूमी जवळील निवासस्थानात राहायची सक्ती करून नर्सेसच्या मूलभूत हक्काची पायमल्ली होते. कार्यात्मक शारीरिक क्षमता रिक्त पदाचा आढावा न होता शासनाकडून अनेक योजना, ऑनलाइन पोर्टल आणले जातात आम्ही मान्य करतो की त्या योजना समाजाच्या रुग्णाच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी असल्या तरी आमची शारीरिक क्षमता आणि रिक्त पदाचा आढावा न घेतल्यामुळे परिचारिकांना या अतिरिक्त कामामुळे परिचारिकांना त्यांच्या हक्काची कुटुंबाच्या हक्काची एक दिवसाची रविवारची सुट्टी देखील मिळणे मुश्किल झाले आहे.

11 मे “इंटरनॅशनल मदर्स डे” आज 12 मे “ इंटरनॅशनल नर्सेस डे” हा निव्वळ योगायोगच परंतु या योगायोगातच राज्यातील सर्व नर्सेस शासन-प्रशासन-मानवहक्क आयोग, महिला हक्क आयोग यांना विनंतीपूर्वक विचारणा आणि मनःपूर्वक मागणी करत आहेत की, जागतिक महामारी मध्ये कोविड रुग्णांच्या सोबत घरचे नातेवाईक सुद्धा नसताना या रुग्णाची मातेसमान काळजी घेऊन अनेकांना मरणाच्या दारातून परत आणत कोविड सारख्या आजाराला हरवण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या महाराष्ट्रातील जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागातील कार्यरत नर्सेस ना न्याय कधी मिळणार?

सौ. मिनाक्षी मनोज मुदगल,राज्यध्यक्षा – महाराष्ट्र जिल्हा परिषद नर्सेस संघटना,एन.जी.पी.3130…

 

Leave a Comment

[adsforwp id="47"]