पुणेरी टाइम्स टीम… दौंड केंद्र व राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना अनेक योजना उपलब्ध करून दिल्या जात आहेत. शेतकऱ्यांच्या जीवनमानात बदल घडविण्याच्या दृष्टीने सरकार नेहमी सकारात्मक प्रयत्न करीत आहे. सरकारच्या वतीने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्रैमासिक(2000) दोन हजार रुपये एवढी थेट स्वरूपात आर्थिक रक्कम दिली जाते. मात्र या योजनेचा अनेक शेतकऱ्यांना थेट लाभ मिळत नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या योजनेसंदर्भात अडचणी येतात.
दौंड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना या योजनेचे पैसे मिळत नाहीत किंवा सुरू झालेले पैसे कालांतराने बंद झाले आहेत. अशा शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने तालुका कृषी अधिकारी राहुल माने यांनी आपल्या कार्यालयातील ‘पीएम किसान कक्षाच्या माध्यमातून कामकाज सुरू केले आहे . या कक्ष ठिकाणी सक्षम माहितीपुर्ण अधिकारी व कर्मचारी नेमले आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना आता तालुक्याच्या ठिकाणी नाहक हेलपाटे मारावे लागणार नाहीत.
शेतकऱ्यांनी ‘पी एम किसान कक्ष अधिकारी सोमनाथ देसाई’ यांचा संपर्क क्रमांक 9561474001 यांच्याशी संपर्क साधून आपल्या अडचणी सोडवून घ्याव्यात तसेच गरज असल्यास कार्यालयात उपस्थित राहून आपले बंद झालेले पैसे सुरूळित सुरू करुन घ्यावेत. याबाबत कार्यालयाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात येईल, शेतकऱ्यांना सहकार्य केले जाईल, कार्यालयातून काही अडचण आल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी राहुल माने यांनी केले आहे…