पुणेरी टाइम्स टीम…सध्या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून चोरटे अनेकांची बैंक खाती रिकामी करीत आहेत, ऑनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत, यातच चोरट्यांनी अनोखी शक्कल लढवत PM Kisanlist.APK किंवा PM kisan APK या संदेशाची लिंक सोशल मीडियावर पाठवित अनेकांची फसवणूक केली जात आहे. ही apk फाईल उघडताच आर्थिक फसवणुकीचे शक्यता वाढत चालली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी अशी कोणतीही फाईल डाऊनलोड अथवा उघडू नये याबाबत शेतकऱ्यांनी याबाबत काळजी घ्यावी व सावधानता बाळगावी व फसवणूक टाळावी असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय आणि तालुका कृषी अधिकारी दौंड यांच्या कडून करण्यात आले आहे. तरी अशा फसव्या apk मेसेजची लिंक उघडू नये किंवा सदर लिंकचा वापर शेतकऱ्यांनी करू नये. तसेच अशी काही घटना घडल्यास किंवा आढळून आल्यास त्वरीत जवळच्या संबंधित सायबर पोलिसाकडे तक्रार नोंदवावी असे आवाहन कृषि विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.