पुणे टाइम्स टीम…पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कुरकुंभ महसूल मंडळातील जिरेगाव, लाळगेवाडी, वासुंदे परिसरात मुरूम माफियांनी मोठ्या प्रमाणात नियमबाह्य बेकायदेशीर पद्धतीने मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन केले आहे. जिरेगाव मधील एका ‘नवीनशर्त’ गटामधील मोठ्या प्रमाणात झालेले उत्खनन चर्चेचा विषय बनला आहे. दौंड बारामती राज्य महामार्ग लगत झालेल्या मोठ्या उत्खानावर कोणाची ‘मेहरबान’ आहे असाही सवाल येथून जाणाऱ्या वाटसरूंना व स्थानिकांना पडत आहे. याबाबत सर्वकाही माहिती असूनही स्थानिक अधिकारी कर्मचारी यांची भुमिका “हाताची घडी तोंडावर बोट” अशी आहे. त्यामुळे येथील अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद बनली आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून शासनाचा लाखो रुपयांचा बुडवलेला महसूल वसूल करण्याची गरज आहे. या माफीयांना कोणाचा आशीर्वाद आहे हे शोधून माफियां व शासनाच्या हितावह नसणाऱ्या उदासीन कर्मचारी अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची गरज आहे…