पुणे प्रतिनिधी – पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये बातमीदार म्हणून काम करणारे तसेच अन्यायाला वाचा फोडून अनेक विषय तडीस नेणारे ‘बातमीदार’ म्हणून ओळख असलेले पाटस येथील दैनिक पुण्यनगरीचे प्रतिनिधी, व ‘ई टीव्ही भारतचे’ पुणे जिल्हा बातमीदार सचिन आव्हाड यांना राहू(ता. दौड) येथे शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने दौंड च्या माजी आमदार ‘रंजना कुल’ यांच्या हस्ते आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. यावेळी बोलतांना आव्हाड यांनी पुढे सर्वसामान्य घटकाला केंद्रबिंदू मानून ‘शेतकऱ्यांच्या हितासाठी’ व “अन्याया विरोधात न्यायासठी बातमीदारी करणार असल्याचे यावेळी आव्हाड व्यक्त झाले.