ठळक बातम्या

कुरकुंभ पोलीस चौकीला स्वतंत्र पुर्णवेळ अधिकाऱ्याची गरज, गस्तीसाठी अतिरिक्त वाहनाची आवश्यकता… “पी एम किसान” योजनेचे पैसे बंद झालेत, थेट दौंडच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील ‘पी एम किसान कक्ष अधिकारी सोमनाथ देसाई’ यांच्याशी संपर्क साधा -9561474001मोबाईलवर “PM किसान” ची ‘APK फाईल’ आलीय तर बैंक खाते होवू शकते रिकामं, कृषी विभागाने केलंय हे महत्त्वाचे आवाहन – ही घ्या काळजी…पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…माफियांना ‘अधिकाऱ्यांचा’ आशीर्वाद, कुरकुंभ मंडळात कोट्यावधी रुपयांचा गौण खनिज बुडवून नियमबाह्य उत्खनन…

अखिल भारतीय मराठा महासंघ व सकल मराठा समाजाच्या वतीने शिवजन्मोत्सवाचे आयोजन…..

दौंड: अखिल भारतीय मराठा महासंघ व सकल मराठा समाजाच्या( दौंड शहर व तालुका) वतीने हिंदुस्तानचे आराध्य दैवत राजे श्री शिवरायांच्या जन्मोत्सवाचे(19 फेब्रुवारी, शासकीय शिवजयंती) आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने दिनांक 16 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी रोजी शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. दि.16 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता दौंड कसबे व पंचक्रोशीत दवंडी रथाचा चा शुभारंभ करून शिवजन्मोत्सवास सुरुवात करण्यात येणार आहे.दि.17 फेब्रुवारी रोजी तुळजाभवानी मर्दानी खेळ, प्रशिक्षण व सांस्कृतिक सेवा संस्था यांचे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन( पोलीस स्टेशन समोर),दि. 18 फेब्रुवारी रोजी रक्तगट व मधुमेह तपासणी शिबिर( पोलीस स्टेशन समोर),दि.19 फेब्रुवारी रोजी शिवकालीन वेशभूषा स्पर्धा( छत्रपती शिवाजी महाराज चौक), घरोघरी शिवजन्मोत्सव देखावा स्पर्धा, शिवजन्म सोहळा, शिवरायांना अभिवादन- मानाचा मुजरा, मर्दानी खेळ व लेझीम, महाराष्ट्र गीत सादरीकरण( नवयुग शिक्षण संस्थेच्या विद्यार्थिनी), आंतरशालेय शिवकालीन जिवंत देखावा व चित्ररथ स्पर्धात्मक शोभायात्रा, जिवंत देखाव्यांचे स्पर्धात्मक सादरीकरण व पारितोषिक वितरण समारंभ आदि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Leave a Comment

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

[adsforwp id="47"]