पुणेरी टाइम्स टीम…
संत जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी महामार्गावर दौंड तालुक्यातील वासुंदे येथे भीषण अपघात घडल्याची घटना (सोमवारी ता. ३०) दुपारी १२:०० वाजता घडली आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, चिंचणी येथील युवक अक्षय चव्हाण व पाटस येथील महिला प्रीती भोसले हे स्विफ्ट कार मधून बारामतीकडे जात असताना त्यांच्याकडील असणार्या भरधाव वेगातील ( एम.एच १२ डब्लू के ४२८७) कारचा चालक अक्षय याचा कारवरील ताबा सुटल्याने कार महामार्गाच्या दुभाजकावरून 70 फूट पुढे गेली व उड्डाणपुलावरील सुरक्षा कठड्यावर आदळून (सोमवारी ता. ३०) दुपारी १२:०० वाजता दरम्यान भीषण अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये कारचा वेग ही प्रचंड असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. या अपघातामध्ये हॉटेल व्यवसायिक अक्षय बाळासाहेब चव्हाण (रा. चिंचणी ता. शिरुर) महिला प्रीती विशाल भोसले (रा. पाटस ता. दौंड) असे या अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
अपघाताचा आवाज ऐकताच वासुंदे येथील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातातील युवक व महिला यांना तातडीने बाहेर काढत रुग्णवाहिकेतून बारामती येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला. घटनास्थळी तातडीने कुरकुंभ पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील तसेच सहाय्यक फौजदार श्रीरंग शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली.