ठळक बातम्या

क्रीडामंत्री ‘दत्तात्रय भरणे’ गोविंदाच्या सुरक्षितेसाठी धावले, इंदापूरच्या आठ दहीहंडी संघांना “मॅट” उपलब्ध करून देणार…“सायबर गुन्हेगारी” रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलावीत – आमदार ‘राहुल कुल’ यांची विधानसभेत मागणीदौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…मलठणच्या उपसरपंचदी आमदार ‘राहुल कुल’ गटाच्या “सोनाली जगताप” बिनविरोध…राज्याच्या राजकारणात राहुल कुलांचा यशस्वी डाव, काँग्रेस-राष्ट्रवादीतील असंतोषाचा भाजपला फायदा; कुल यांच्या नेतृत्वात राजकारणातील मोठे चेहरे भाजपात…

शिरूर-हवेलीतून महायुतीकडून ज्ञानेश्वर कटके प्रबळ दावेदार, वाचा सविस्तर बातमी मध्ये…

पुणेरी टाइम्स टीम (शिरूर : ता, १६): शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी कांग्रेसकडे असल्याने या मतदारसंघातून खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, अजित पवार आपल्या बारामती मतदारसंघातूनच रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, शिरूर-हवेलीत उमेदवार देताना इलेक्टीव्ह मेरीट पाहूनच उमेदवारी दिली जाणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केल्याने या मतदारसंघातून महायुतीकडून प्रबळ दावेदार असलेले ज्ञानेश्वर कटके यांची उमेदवारी महायुतीकडून जवळपास निश्चित मानली जात आहे. महायुतीमधील अन्य घटक पक्षांकडूनही कटके यांच्या नावाला पसंती देण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे, शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाकडून विद्यमान आमदार अशोक पवार यांना उमेदवारी दिली जाणार असल्याने त्यांच्या तोडीस तोड किंबहुना विजयी होणाऱ्यालाच उमेदवारी देण्याबाबत अजित पवार ठाम आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भर सभेत तू कसा आमदार होतो, असा थेट इशारा आमदार अशोक पवार यांना दिला होता. अजित पवार यांनी दिलेले हे आव्हान पूर्णत्वास नेण्यासाठी ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे पाहिलं जाते आहे. याशिवाय महायुतीकडून शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात करण्यात आलेल्या सर्वेक्षणनुसार भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी अजितदादा गट या तीनही पक्षाकडून ज्ञानेश्वर कटके यांच्या बाजूनेच जनतेचा कौल असल्याचे समोर आल्याने महायुतीमध्ये उमेदवारीसाठी कटके यांना विविध माध्यमातून संपर्क करून गळ घालण्याचा प्रयत्न होत आहे. महायुतीमधील भाजपा तसेच शिवसेना शिंदे गटाकडूनही कटके यांच्या नावाला प्राधान्य देण्यात आले आहे.

अजितदादा गटाकडून दिलेले शब्द पूर्ण करण्यासाठी तसेच शिरूर-हवेलीचा विकास घडवण्यासाठी सामान्यातील सामान्य एकमेव चेहरा म्हणून जनतेकडून ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे पाहिले जात आहे. याच कारणास्तव महायुतीकडून एकमताने कटके यांना मैदानात उतरवण्याची जोरदार तयारी सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते.

Leave a Comment

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

[adsforwp id="47"]