पुणेरी टाइम्स टीम…दौंड तालुक्यातील वासुंदे येथे गौण खनिज प्रतिष्ठान अंतर्गत पाटस बारामती रस्ता ते जांबले वस्ती नंबर १ हा रस्ता कामासाठी गौण खनिज प्रतिष्ठान अंतर्गत वीस लाख रुपये निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. सदर काम सार्वजनिक बांधकाम विभाग दौंड यांच्या अधिपत्याखाली झाले असून या कामावरती काम सुरू केल्याचा दिनांक २०२२ नमुद केलेला आहे तर काम संपल्याचा दिनांक ही २०२२ सालच आहे. मात्र सदरचे काम हे प्रत्यक्षात २०२४ साली सुरू झाले असून मे २०२४ रोजी हे काम पूर्ण झाले आहे. या कामाला सहा महिन्याच्या आतच खड्डे पडले असून ठिकठिकाणी हा रस्ता खचला आहे. बांधकाम विभागाच्या तारखांचा घोळ व प्रत्यक्ष कामांच्या तारखा यामुळे रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंबंधीत कामाबाबत दौंड सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता हरिश्चंद्र माळशिकारे यांच्याशी संपर्क केला असता आपण कार्यालयात या तिथे बोलू असे सांगण्यात आले. संबंधित कामाच्या प्रवेशाच्या ठिकाणी कामाचा फलक लावला आहे. यावरती फलकावरील खासदार सुप्रिया सुळे, माजी आमदार रमेश थोरात, आप्पासाहेब पवार यांची नावे आहेत. ही नावे झाकून ठेवण्याची नामुष्की ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागावर आली आहे. सध्या दौडच्या बांधकाम विभागाची अनेक प्रकरणे चव्हाट्यावर येत आहेत. त्यामुळे दौंड सार्वजनिक बांधकाम विभागाचे उच्चस्तरीय समितीमार्फत लेखापरीक्षण होण्याची गरज आहे. दौंड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे दौंडचा सार्वजनिक बांधकाम विभाग नेहमी चर्चेत येत आहे. त्यामुळे दौंडच्या सार्वजनिक बांधकाम विभागात नक्की चाललेय काय हा ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चर्चेचा विषय बनत आहे…
ठळक बातम्या
कुरकुंभ MIDC परिसरात ‘प्लेटची’ चोरी करणाऱ्या ‘चार चोरट्यानां’ दौंड पोलीसांनी कडून बेड्या, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त- सपोनि नागनाथ पाटील यांची माहिती……दौंड मध्ये’ रमेश थोरातां’साठी “शरद पवार” कोणता डाव टाकणार? महाविकास आघाडीची आज वरवंडला जाहीर सांगता सभा…दौंडच्या राजकारणात नवा ट्विस्ट येणार! खासदार ‘निलेश लंके’ यांचे आव्हान आमदार ‘राहुल कुल’ यांनी स्विकारले, विरोधकांच्या “भूमिकेकडे” तालुक्याचे लक्ष…?निवडणूकीच्या धामधुमीत ‘आमदार राहुल कुलांकडून’ आरोग्य सेवेचे व्रत सुरूच, महिनाभरात “वीसहुन” अधिक रुग्णांना मदत…दौंड विधानसभा मतदारसंघाकरीता निवडणूक निरीक्षक म्हणून एम गौतमी यांची नियुक्ती