ठळक बातम्या

कुरकुंभ MIDC परिसरात ‘प्लेटची’ चोरी करणाऱ्या ‘चार चोरट्यानां’ दौंड पोलीसांनी कडून बेड्या, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त- सपोनि नागनाथ पाटील यांची माहिती……दौंड मध्ये’ रमेश थोरातां’साठी “शरद पवार” कोणता डाव टाकणार? महाविकास आघाडीची आज वरवंडला जाहीर सांगता सभा…दौंडच्या राजकारणात नवा ट्विस्ट येणार! खासदार ‘निलेश लंके’ यांचे आव्हान आमदार ‘राहुल कुल’ यांनी स्विकारले, विरोधकांच्या “भूमिकेकडे” तालुक्याचे लक्ष…?निवडणूकीच्या धामधुमीत ‘आमदार राहुल कुलांकडून’ आरोग्य सेवेचे व्रत सुरूच, महिनाभरात “वीसहुन” अधिक रुग्णांना मदत…दौंड विधानसभा मतदारसंघाकरीता निवडणूक निरीक्षक म्हणून एम गौतमी यांची नियुक्ती

“निष्ठावंतांच्या” हाती काय…झेंडा की फक्त दांडा! निष्ठावंत विरुद्ध गद्दार ‘दौंडमध्ये’ काय आहे चर्चा..‌?

पुणेरी टाइम्स टीम…(दौंड) राजकीय

       राज्यातील राजकारण्यांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यामुळे दौडमध्येही राजकीय वातावरण तापू लागले आहे. दौंड मध्ये महायुतीमध्ये बिघाडी झाली आहे. दौंड विधानसभेसाठी भाजप कडून राहुल कुल यांचे नाव जाहीर झाले आहे. तर माहिती मधील घटक पक्ष असलेल्या अजित पवार गटाचे रमेश थोरात यांनी कोणत्याही परिस्थितीत आपल्याला निवडणूक लढवायची आहे असे जाहीर करुन महायुतीतील अनेक नेत्यांची डोकेदुखी वाढवली आहे, दौंड विधानसभेची निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कार्यकर्त्यांचा रमेश थोरात यांना हाती तुतारी घेण्याचा आग्रह आहे, मात्र शरद पवार यांच्याकडून अध्याप याबाबत कोणताही सूचक इशारा देण्यात आलेला नाही. तसेच महायुतीतील नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही रमेश थोरात यांच्या या भूमिकेबाबत कोणतेही वक्तव्य अद्यापही केले नाही. तसेच वर्तमानपत्रातील बातम्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अद्यापही प्रतिक्रिया देणे टाळलेले आहे. त्यामुळे रमेश थोरात यांच्या मागे नक्की कोणती शक्ती आहे हे समजणे कठीण झाले आहे. २००९ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर राहुल कुल यांना पक्षात निष्ठावंत म्हणून मिरवणाऱ्यांनी गद्दारी करत धोका दिला. २०१४ ला याचाच प्रत्येक थोरात यांना आला. तर २०१९ ला यापेक्षा वेगळं काही घडलं नाही. त्यामुळे निष्ठावंत म्हणून मिरवणारे ‘गद्दार’ आता तरी उघडे पडणे गरजेचे आहे. निष्ठावंत आणि गद्दार एकत्र असल्याने ‘पुढे धोका आहे…रे’ हे अटळ आहे. त्यामुळे गद्दार वेगळे करून निष्ठावंतांना सोबत घेऊन निवडणूक लढणे फायद्याचे ठरणार आहे. दौंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, च्या पाचही उमेदवारांची महत्त्वाची बैठक केडगाव येथे नुकतीच पार पडली आहे अशी माहिती समोर येत आहे. या बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले गेले असल्याची खात्रीशीर माहिती उपलब्ध आहे…

शरद पवार कुटुंबीयाशी एकनिष्ठ राहिलेले आप्पासाहेब पवार यांच्या नावाचीही दौंड विधानसभा मतदारसंघात मोठी जोरदार चर्चा सुरू आहे. आप्पासाहेब पवार यांना तालुक्यातील प्रत्येक गावातील वाडी, वस्तीवरील खडानखडा माहिती असल्याने गाव खेड्यातील, शहरातील अडीअडचणी, स्थानिकांचे प्रश्न माहित आहेत. आप्पासाहेब पवार यांचे सामाजिक चळवळीतील स्थान भक्कम आहे. त्यामुळे दौंड मधील राजकारणात आप्पासाहेब पवार यांचाही पत्ता तितकाच मजबूत आहे हे लोकसभा निवडणुकीत दिसूनही आले आहे. कुल – थोरात यांनी लोकसभा निवडणुकी वेळी एकत्र येत शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांना शह देण्यासाठी महायुतीच्या उमेदवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा जोरदार प्रचार केला. ऐरवी विळ्या भोपळ्याचा वाद असलेले कुल – थोरात एकत्र येऊनही दौंड मधील मतदारांनी ‘तुतारीला’ साथ देत शरद पवारांचे हात बळकट करण्यासाठी आप्पासाहेब पवार व त्यांच्या साथीदारांच्या भरवश्यावर नेतृत्व मान्य करीत तब्बल २५००० मतांचे मताधिक्य दिले. त्यामुळे ‘आप्पासाहेबही’ कमी नाहीत हे सिद्ध झाले. मात्र सध्या विधानसभेचे वातावरण तापू लागल्याने दौंड विधानसभेमध्ये रमेश थोरातांशिवाय राहुल कुल यांना शह देणे कठीण आहे असे उतावीळ कार्यकर्ते बोलत आहेत असे राजकीय जाणकारांचे मत आहे. मागील निवडणुकीमध्ये मतमोजणीच्या अखेरच्या फेरीपर्यंत मतांमध्ये चढउतार होत रमेश थोरात यांनी राहुल कुल यांना नाकीनऊ आणले होते. त्यामुळे रमेश थोरात यांना राजकारणात हलक्यात घेणे हे येथील राजकीय व्यवस्थेला हादरून सोडणारे आहे.

जर शरद पवार यांनी रमेश थोरात यांना तिकीट देऊन थोरात यांच्या हाती तुतारी देत निवडणूक लढवायला लावली तर दौंड मधून शरद पवारांचा निष्ठावंत नेता असणाऱ्या आप्पासाहेब पवार यांचे राजकीय भवितव्य पूर्णपणे अधांतरी होणार आहे. दौंड मधील आप्पासाहेब पवार कुटुंबीय हे फक्त पंचायत समिती इथपर्यंत मर्यादित आहे का? असाही सवाल आप्पासाहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता विचारत आहे. पवार साहेबांनी जर यावेळी आप्पासाहेबांना विधानसभेसाठी डावलेले तर निष्ठावंत कार्यकर्ते यांनी झेंडा तुमच्याकडे आणि दांडा आमच्याकडे ही भूमिका घेण्याचा पवित्रा बोलून दाखविला आहे. त्यामुळे शरद पवार हे निष्ठावंतांना डावलून दौंड विधानसभेसाठी वेगळा निर्णय घेतात की लोकसभेला आपल्या लेकीसोबत काम करणाऱ्यांना दौंड विधानसभेसाठी संधी देतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. शरद पवार साहेबांसोबत विधानसभेच्या वेळी आप्पासाहेब पवार, नामदेव ताकवणे, रामभाऊ टुले, यासह अनेक निष्ठावंत नेते व हजारो कार्यकर्ते कुल थोरात यांना न जुमानता थेट रस्त्यावरती उतरुन वाडी वस्ती व घराघरापर्यंत पोचून प्रचार करत होते. तुतारी चिन्ह समजून सांगत घरोघरी पोहोचत होते. त्यामुळे निष्ठावंतांना डावलणे शरद पवारांना परवडणारे नाही असेही कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. मात्र सर्व निर्णय हे शरद पवारांकडे असल्याने येणाऱ्या काळात ‘आमदार राहुल कुल’ यांच्या कमळाच्या झेंड्या विरोधात कोणता झेंडा कोणाकडे आणि दांडा कोणाकडे हे समजण्यासाठी थोडा अवधी जाणे गरजेचे आहे, संपूर्ण दौंड तालुक्यामध्ये मात्र याची जोरदार चर्चा सुरू आहे…

Leave a Comment

[adsforwp id="47"]