पुणेरी टाइम्स टीम… (दौंड) दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांना ‘लोकनेते स्व. सुभाष आण्णा कुल’ कृषी भुषण पुरस्कार २०२३-२४ वितरण सोहळा आयोजन आज शनिवार दिनांक २१/०९/२०२४ रोजी सकाळी ११:३० वाजता श्रीकृष्ण मंगल कार्यालय,सुपा रोड चौफुला, ता. दौंड येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी दौंड तालुक्यातील सर्व उत्कृष्ट शेतकऱ्यांना ‘लोकनेते स्वर्गीय सुभाष आण्णा कुल’ “कृषी भुषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून दौंडचे आमदार ‘राहुल कुल’ हे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती सभापती गणेश जगदाळे यांनी दिली आहे. या कार्यक्रमासाठी शेतकरी बंधूंनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहवे अशी विनंती दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
