पुणेरी टाइम्स टीम… दौंड
दौंड तालुक्यातील गोरगरीब रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा व मोफत उपचार मिळावेत यासाठी दौंड तालुक्याचे आमदार ॲड. राहुल कुल यांच्या संकल्पनेतून व कै. सुभाष आण्णा कुल मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आज गुरुवार दि. १९ सप्टेंबर २०२४ रोजी, सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत श्री. बोरमलनाथ मंदिर, बोरीपार्धी (चौफुला) येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार राहुल कुल यांच्या कार्याकडून देण्यात आले आहे.
या महाआरोग्य शिबीरात पुणे जिल्ह्यातील अनेक नामांकित रुग्णालयांचा सहभाग असून विविध वैद्यकीय तपासण्या, उपचार व नियोजित शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार असून सर्व नागरिकांनी या महाआरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा अशी विनंती आमदार ॲड. राहुल कुल यांनी केली आहे.