पुणे टाइम्स टीम… पुणे
संपूर्ण राज्यामध्ये १७ सप्टेंबर पर्यंत गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. दिनांक १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती विसर्जन करण्यासाठी मंडळाकडून मोठ मोठ्या मिरवणुकाचे सर्वत्र आयोजन केले जात असते. सदर मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात “लेझर लाईट” चा वापर केला जातो, असे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. या ‘लेझर लाईट’ मनुष्याच्या डोळ्यांना घातक आहेत. मिरवणूक बघण्याकरता आलेल्या नागरिकांना व भाविकांच्या डोळ्यांना या लेझर लाईट मुळे ‘इजा’ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गणपती विसर्जन मिरवणुका वेळी शांतता व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यासाठीच्या उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्याकडून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2२०२३ चे कलम १६३ अन्वये लेझर लाईट वापरण्यास प्रतिबंध करण्यात बाबतचा आदेश ज्योती कदम, अप्पर जिल्हाधिकारी पुणे यांच्या कार्यालयाकडून जारी करण्यात आला आहे. सदर आदेशामध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर करताना कोणी आढळून आल्यास अशी व्यक्ती, मंडळ, संचालक यांच्यावर भारतीय संहितेचे कलम २२३ प्रमाणे कारवाई करण्यात येईल असे या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे गणपती विसर्जन मिरवणुकी दरम्यान डीजे मालक व लेझर लाईट वापरणाऱ्यावरती पोलिसांची करडी नजर असणार आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लेझर लाईटचा वापर करणे टाळणे गरजेचे आहे.