ठळक बातम्या

आमदार राहुल कुल कुरकुभं एमआयडीसीतील “प्रदुषणाबाबत आक्रमक” कामगार मंत्री याच्या उपस्थितीतील बैठकीत केल्या विविध मागण्या, अधिकाऱ्यांना धरले धारेवर…श्री सिमेंट कंपनीला “शिवसंग्रामचे नेते वसंत साळुंखे” यांचा इशारा अन्यथा…कुरकुंभ पोलीस चौकीला स्वतंत्र पुर्णवेळ अधिकाऱ्याची गरज, गस्तीसाठी अतिरिक्त वाहनाची आवश्यकता… “पी एम किसान” योजनेचे पैसे बंद झालेत, थेट दौंडच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील ‘पी एम किसान कक्ष अधिकारी सोमनाथ देसाई’ यांच्याशी संपर्क साधा -9561474001मोबाईलवर “PM किसान” ची ‘APK फाईल’ आलीय तर बैंक खाते होवू शकते रिकामं, कृषी विभागाने केलंय हे महत्त्वाचे आवाहन – ही घ्या काळजी…

दौंडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी भानावर कधी येणार? तीन कोटींच्या रस्त्याला चार महिन्यातच खड्डे….

पुणेरी टाइम्स टीम – कुरकुंभ (अलिम सय्यद) दौंड तालुक्यातील पांढरेवाडी गावातील मुख्य रस्त्यावरील चार ते पाच महिन्यापूर्वी झालेल्या रस्त्याची खड्डे पडून अक्षरशा चाळन झाली आहे. रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची बाब समोर आली असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे निष्क्रिय प्रशासन गेंड्याची कातडी पांघरून सुस्त झाले आहे. या रस्त्यावरून शालेय विद्यार्थी व शेतकरी तसेच कुरकुभं औद्योगिक वसाहतीमध्ये उदरनिर्वासाठी येणारे कर्मचारी प्रवाश्यांना खड्डे हुकवून या रस्त्यावरून प्रवास करावा लागतोय.

हिंगणीगाडा– रोटी शिव ते भागवत, निंबाळकर वस्ती अशा जवळपास तीन किलोमीटर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या रस्त्याला चार ते पाच महिन्यातच खड्डेच खड्डे पडले असून अनेक ठिकाणी डांबरी रस्त्याला तडे पडलेत तर कुठे खड्डे पडून डांबरी उखडल्याची घटना घडली आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र मूग गिळून गप्प आहे. संबंधित झालेला रस्ता हा कोट्यवधी रुपये खर्च करून केला आहे. परंतु काही दिवसांतच हा रस्ता खराब झालाय मंग याला जबाबदार नक्की सार्वजनिक विभागाचे अधिकारी की ठेकेदार आहेत असा सवाल नागरिक करत आहे. या रस्त्याच्या कामाला सार्वजनीक बांधकाम विभागाच्या माध्यमातून अंदाजपत्रकानुसार तीन कोटी रुपये एवढा निधी असल्याचं सांगितलं जातंय, परंतु पांढरेवाडी गावातील मुख्य रस्ता हा एका टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. सदरचे रस्त्याचे काम मागील चार ते पाच महिन्यांपूर्वी डांबरीकरण झाले होते. सदर रस्ता चार ते पाच महिन्यात  खराब झाला कसा, संबंधित ठेकेदाराने रस्ता करायचा म्हणून केला का,  कोट्यावधी निधीमधून भ्रष्टाचार करीत कमी खर्चात रास्ता केला का, बाकी निधी संबंधित ठेकेदार व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या खिश्यात गेले की काय? असा प्रश्न येथील ग्रामस्थ करीत आहेत.  याच रस्त्यावर चार ते पाच महिनेपुर्वी झाले तरी देखील संबंधित ठेकेदाराने त्या ठिकाणी कामाचे नाम फलक देखील लावले नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी काळ्या यादीत टाकण्याची मागणी येथील स्थानिक करीत आहेत. तसेच संबंधित ठेकेदाराकडून चांगली दर्जेदार कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने करुन घ्यावी अशी मागणी ग्रामस्थ येथील नागरिक करीत आहेत. कोट्यावधी रुपयांचा रस्ता आणि तक्रार आली की सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारीही सांगतात कामच पूर्ण नाही, ही मात्र येथील व्यवस्थेची शोकांतिका आहे.

सदरील रस्त्याबाबत संबंधित शाखा अधिकाऱ्यांना विचारले असता थोडे फार खड्डे पडले आहेत. याबाबत संबंधित ठेकेदाराला ते खड्डे बुजवण्यास सुचना दिलेल्या आहेत, व आपण त्या ठेकेदाराला बिल काही दिलेले नाही. फलक लावले नसून हे कामच पूर्ण झालेले नाही अशी माहिती देण्यात आली.- रोहिदास करे, सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी, दौंड

Leave a Comment

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

[adsforwp id="47"]