पुणेरी टाइम्स टीम – पुणे
संपूर्ण देशासह राज्यांमध्ये पुणे शहराचा व जिल्ह्याचा बोलबाला आहे. विकासाच्या दृष्टीने पुणे शहरानंतर बारामतीचा क्रम लागतो. प्रगत, सुशिक्षित, आणि रोजगार आदीबाबत सदन व सक्षम असलेल्या भागांमध्ये पुणे शहरानंतर बारामतीचा क्रम आहे. राज्याच्या व देशाच्या राजकारणाची काहीशी सूत्रे याच बारामती मधून नेहमी हलत असतात. याच बारामती लोकसभा मतदारसंघातील दोन महिला खासदार राज्याच्या राजकारणात देशाची व व एक उपमुख्यमंत्री, राज्यमंत्री येथील स्थानिक घडी बसवण्यासाठी काम करीत आहेत. मात्र याच बारामती मतदारसंघातील दौंड तालुक्यातील वासुंदे, हिंगणीगाडा, रोटी, पाटस येथील सावित्रींच्या लेकीच्या डोळ्यात पाणी इथल्या व्यवस्थेने आणले आहे मात्र येथील लोकप्रतिनिधींना हे दिसत नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल. कष्टकरी, मजूर, कामगार, महिला, मुलींना शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी जाणासाठी दळणवळणाची सोय म्हणून एसटीची व्यवस्था शासनाने राज्यभर उपलब्ध करून दिली आहे. मात्र दौंड आगार प्रमुखाच्या आडमुठेपणामुळे येथील मुलींना तासनतास बसची वाट पाहावी लागत आहे, महामार्गावर उन , पाऊस,वारा याच्याशी सामना करीत तात्काळत बसावे लागत आहे. यामध्ये मुलींचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत असून मानसिक त्रास ही मोठ्या प्रमाणात होत आहे. याबाबत अनेक महिलांनी एसटी शी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता आगारप्रमुखांकडून उडवा उडवीची उत्तरे देण्याचा प्रकार सुरू आहे. डेपो तोट्यात आहे, एसटी तोट्यात आहे, आमचा सात तारखेचा पगार दहा तारखेला होतो अशी फालतू कारणे देत मुलींच्या भावनांशी खेळण्याचे काम येथील आगार प्रमुख करीत आहे, येथील आगार प्रमुखाला आपण लोकाभिमुख शासनाचे जनसेवक असल्याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तातडीने आगार प्रमुखाच्या कामकाजाची चौकशी होण्याची गरज आहे. तसेच मुली व महिलांच्या भावनांशी खेळणाऱ्या आगार प्रमुखावर वरिष्ठांनी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी महिला करीत आहेत. याबाबत लवकरच संत जगद्गुरु तुकाराम महाराज महामार्गावर विद्यार्थ्यांनीसह महिला शेतकरी समवेत आंदोलन छेडणार असल्याचे यावेळी महिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितले…