ठळक बातम्या

क्रीडामंत्री ‘दत्तात्रय भरणे’ गोविंदाच्या सुरक्षितेसाठी धावले, इंदापूरच्या आठ दहीहंडी संघांना “मॅट” उपलब्ध करून देणार…“सायबर गुन्हेगारी” रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलावीत – आमदार ‘राहुल कुल’ यांची विधानसभेत मागणीदौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…मलठणच्या उपसरपंचदी आमदार ‘राहुल कुल’ गटाच्या “सोनाली जगताप” बिनविरोध…राज्याच्या राजकारणात राहुल कुलांचा यशस्वी डाव, काँग्रेस-राष्ट्रवादीतील असंतोषाचा भाजपला फायदा; कुल यांच्या नेतृत्वात राजकारणातील मोठे चेहरे भाजपात…

जिल्ह्यातील प्रस्थापितांचा राजकीय ढाचा ढासळणार, जरांगे पाटलांच्या भुमिकेने जिल्ह्यातील अनेक आमदारांचा जीव टांगणीला…

पुणेरी टाइम्स टीमराज्यात निवडणुकीचे बिगुल वाजू लागले आहे, अनेक आजी-माजी आमदारासह भावी आमदारांनी आपली जोरदार फील्डिंग लावायला सुरुवात केली आहे. मात्र मनोज जरांगे यांच्या भूमिकेमुळे जिल्ह्यातील राजकारणाचे ढाचे डासाळणार आहेत यात शंका नाही. पाटील यांनी उद्या पुण्यात शांतता रॅली आयोजित केली आहे, या रॅलीचा प्रतिसाद पाहता व मराठा समाजाची भूमिका पाहता प्रस्थापितांना घरचा रस्ता दाखवायचा असाच काहीसा पवित्रा मराठा समाजातील सर्वसामान्य घटकांनी घेतला आहे. जिल्ह्यातील राजकारण हे अनेक वर्षांपासून प्रस्थापितांच्या भोवती आहे. मात्र आता गरजवंत मराठा या प्रस्थापितांना धक्का देणार असून राजकीय पंढरी असणाऱ्या बारामतीत बारामती खुद्द अजित पवार यांच्या विरोधात मराठा समाजातील एक मोठी फळी काम करत आहे, बारामती सोबतच दौंड इंदापूर मध्येही शरद पवारांची गोची यशस्वी होण्याची शक्यता आहे. इंदापूर मध्ये मराठा समाजाचे सर्व कार्यकर्ते जरांगे पाटलांच्या भूमिकेसोबत आहेत. दौंड मधील ही चित्र असेच काहीसे आहे. जिल्ह्यातील अनेक गावात  जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी कोपरा बैठका घेण्यात आल्या आहेत, तर पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे स्वागताचे होर्डींग्ज लावले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाचा दबदबा निर्माण झाला आहे. हीच परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यात आहे. त्यामुळे पूर्वीपासून राजकारणाशिवाय राहू न शकणाऱ्या राजश्री पुढाऱ्यांना समाजाच्या रोशामुळे आपले राजकीय करीअर पणाला लागणार आहे असे चित्र काहीसे निर्माण होऊ लागले झाले आहे‌. त्यामुळे यातून सावरण्यासाठी प्रस्थापित राजकारणी काय भूमिका अवलंबणार हे पाणी महत्त्वाचे आहे… मात्र जरांगे पाटलांच्या फॅक्टर पुढे राजकारणाचे भलेभले फॅक्टर फेल होऊ लागले आहेत त्यामुळे पाटलांना शह देणं राजकारणी मंडळींना  परवडणारे नाही मात्र आता सामना अटळ आहे..

Leave a Comment

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

[adsforwp id="47"]