पुणेरी टाइम्स टीम (दौंड)
प्रा.लक्ष्मण हाके यांनी खोटी माहिती देणे थांबवावे”-चर्चेस यावे आम्ही तयार आहे, प्रा.लक्ष्मण हाके यांचे आव्हान आम्ही स्वीकारले आहे असे मनोज जरांगे पाटील समर्थक वसंतराव साळुंखे यांनी माध्यमांना सांगितले आहे. लक्ष्मण हाके हे समाज बांधवांना भेटण्यासाठी उद्या दौंड तालुक्यातील पाटस येथे येणार आहेत, त्यामुळे ओबीसी नेते हाके यांनी मनोज जरांगे पाटील व त्यांचे सल्लागारांनी चर्चेस येण्याचे आव्हान दिलेले होते. हे आव्हान पाटस येथीलच मनोज जरांगे पाटील समर्थक जय शिवसंग्राम संघटनेच्या साळुंके यांनी स्विकारल्याने प्रा. हाके काय भुमिका घेणार हे महत्त्वाचे आहे.
- तीन चार दिवसांपूर्वी प्रा.लक्ष्मण हाके विविध माध्यमांतून मनोज जरांगे पाटील, त्यांचे सल्लागार, समर्थक आणि आरक्षणाच्या अभ्यासकांना आरक्षण विषयावर लाइव्ह चर्चेचे जाही आव्हान दिले होते. त्यांचे हे आव्हान जय शिवसंग्राम संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव साळुंखे यांनी स्वीकारले आहे. केव्हाही, कुठेही, कुठल्याही चॅनलवर किंवा इतर ठिकाणी या विषयावर लाइव्ह चर्चा करावी. जनतेलाही कळेल खरं काय, खोटं काय आणि ‘दूध का दूध’ व “पानी का पानी” होऊन जाऊ द्या, असे ते म्हणाले. तसेच प्रा.लक्ष्मण हाके यांनी जनतेला खोटी – माहिती देऊन संभ्रम निर्माण करणे थांबवावे, असे आवाहन वसंतराव साळुंखे यांनी यावेळी केले आहे.
मराठा कुणबी नाहीत. हे हाकेंचे विधान घांदात खोटे असून संविधानविरोधी व राजकीय असून, दोन समाजात जातीय तेढ निर्माण करून वाद पेटवणारे आहे. त्यांनी संविधान व लोकशाही मार्गाने आरक्षणावर चर्चा करावी. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले जाईल. तसेच त्यांना विचारलेल्या प्रश्नांचेही त्यांनी उत्तर द्यावे, असे खुले आव्हानही साळुंखे यांनी दिले. हाके दररोज जरांगे पाटील व त्यांच्या सल्लागार आणि अभ्यासकांना चॅलेंज करत असताना वसंतराव साळुंखे हे हाके यांचे चॅलेंज स्वीकारणारे एकमेव अभ्यासक पुढे आले आहेत.
वसंत साळुंके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सगेसोयरेचा अध्यादेश काढल्यानंतर या अध्यादेशाविरोधात उच्च न्यायालयात कुणीही याचिका दाखल करू नये किंवा याचिका दाखल करण्यापूर्वी आमचे म्हणणे मांडण्याची संधी मिळावी म्हणून त्यावेळी अर्ज उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले होते. त्यावेळी देखील वसंत साळुंके हे नाव चर्चेत आले होते….आता तर थेट साळुंखे यांनी प्रा. लक्ष्मण हाके यांना आव्हान दिल्याने ‘प्रा.हाके काय भूमिका’ घेतात हे पहावे लागणार आहे…