पुणेरी टाइम्स टीम…
दौंड तालुक्यातील मौजे कडेठाण हे महसूली गाव विभक्त होण्यासाठी शासनाची अधिसूचना १२/१२/२०१४ रोजी झालेली असून, याचा आकारबंद करण्याचे काम भूमी अभिलेख कार्यालयाकडे सोपविण्यात आले आहे. वरवंड गावातून कडेठाण चा वेगळा आकारबंद बनवण्यासाठी वेळ मिळाला नाही. १० वर्ष झाली तरी दौंडच्या भूमी अभिलेख विभागाला हे काम पूर्ण करता आले नाही ही प्रशासनाची मोठी नामुष्की आहे, त्यामुळे दौंडच्या भूमिअभिलेख विभागात नक्की चाललेय तरी काय याची कधी वरिष्ठांनी विचारपूस केली का नाही असा संम्रही सवाल येथील स्थानिकांना पडत आहे. या विभागाने आकारबंद तयार करणेसाठी घेतलाला वेळ नवल करण्यासारखीच घटना आहे. त्यामुळे या भूमिअभिलेख विभागातील कामकाजाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.
विभाजन आकारबंद करण्याचे काम याच विभागातील राऊत नावाचे कर्मचारी करीत आहेत या साहेबांकडे गावकरी चकरा मारुन थकले मात्र कडेठाण वाडी चे विभाजन आकारबंद काम अद्याप झाले नाही. गेली वर्षभरापासून आख्खी ग्रामपंचायत त्यांना
वारंवार भेटून विनंती करून साहेब आमच्या गावचे तेवढं काम करा हे सांगत होते. फोन करून वारंवार स्मरण करून देत होते. पण या महाशयांना त्यांच्या खात्याप्रमाणेच गेंड्याची कातडी पांघरून झोपेचे सोंग घेण्याची सवय जाईना. हे काम आज होईल, उद्या होईल, नंतर होईल, किंवा सुट्टी संपल्यावर होईल, सांगळे शिपाई सुट्टीवर आहेत अशी वेगवेगळी कारणे देऊन धावडे यांनी कित्येक दिवस पाठपुरावा केला मात्र प्रशासनाने धावडे यांना फक्त हेलपाटे मारायला लावण्यापलीकडे काहीच केले नाही.
त्यामुळे वैतागलेल्या गावकऱ्यांनी याबाबत काहीतरी करण्याची विनंती स्थानिक पदाधिकारी यांना केली यावर गावचे उपसरपंच यांनी थेट प्रशासनाला निवेदन देत सोमवार दिनांक २४/०६/२०२४ पर्यंत जर आम्हाला कडेठाण महसूल विभक्त आकारबंद तयार करून मिळाला नाही तर मी कडेठाण गावचा उपसरपंच या नात्याने व माझी सामाजिक जबाबदारी म्हणून भूमिअभिलेख कार्यालयासमोर गुरुवार दि. २७/०६/२०१४ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजले पासून आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन अनिल पोपट धावडे यांनी प्रशासनाला दिले आहे. यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास यास सर्वस्वी उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालय दौंड, व या कार्यालयातील अधिकारी राऊत हेच जवाबदार राहतील असे धावडे यांनी माध्यमाना यावेळी सांगितले आहे.
मात्र गावच्या या कामाला एवढे दिवस येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विलंब लावला आहे याबाबत वरिष्ठांनी येथील अधिकारी व कर्मचारी यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी गावकरी आता करू लागले आहेत. त्यामुळे वरिष्ठ या कामचुकार अधिकारी व कर्मचारी यांच्यावर मेहेरबान करणार की कारवाईचा फासा टाकणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.