ठळक बातम्या

आमदार राहुल कुल कुरकुभं एमआयडीसीतील “प्रदुषणाबाबत आक्रमक” कामगार मंत्री याच्या उपस्थितीतील बैठकीत केल्या विविध मागण्या, अधिकाऱ्यांना धरले धारेवर…श्री सिमेंट कंपनीला “शिवसंग्रामचे नेते वसंत साळुंखे” यांचा इशारा अन्यथा…कुरकुंभ पोलीस चौकीला स्वतंत्र पुर्णवेळ अधिकाऱ्याची गरज, गस्तीसाठी अतिरिक्त वाहनाची आवश्यकता… “पी एम किसान” योजनेचे पैसे बंद झालेत, थेट दौंडच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील ‘पी एम किसान कक्ष अधिकारी सोमनाथ देसाई’ यांच्याशी संपर्क साधा -9561474001मोबाईलवर “PM किसान” ची ‘APK फाईल’ आलीय तर बैंक खाते होवू शकते रिकामं, कृषी विभागाने केलंय हे महत्त्वाचे आवाहन – ही घ्या काळजी…

पोलिस अधिकारी ‘सुभाष रुपनवर’ सेवानिवृत्त…

पुणेरी टाइम्स टीम -(केडगाव) आपल्या कामाने पोलीस क्षेत्रामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारे पोलीस अधिकारी सुभाष उपमुख्य सेवानिवृत्त झाले आहेत. कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना बोटावर मोजण्या इतकेच अधिकारी निष्कलंक पाहावयास मिळतात, त्यापैकीच एक नाव म्हणजे ‘सुभाष बापुराव रुपनवर’ हे आहे, पोलिस ठाण्यात काम करत असताना, काॅंन्स्टेबल ते पोलीस उपनिरीक्षक आसा त्यांचा प्रवास 35 वर्षे 7 महिने त्यांनी पोलिस दलात निष्कलंक सेवा केली. पण कधीच कोणताच डाग अंगावर पडुन दिला नाही. स्वतःला कामात झोकून देणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. वरिष्ठांनी दिलेलं काम चोख करण्यात यांचा हात खडा होता.. या चांगल्या सवयी असल्याने काम करतांना कधी अडचणीचा सामना करावा लागला नाही असे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुभाष रुपनवर यांनी यावेळी बोलताना सांगितले. शेतकरी कुटुंबात जन्मलेले सुभाष रुपनवर यांचे शिक्षण दापोडी ,नानगाव येथे झाले. रामभाऊ रुपनवर यांचे बंधु सुरूवातीला पोलिस दलात भरती झाले. नंतर सुभाष यांनी पोलीस दलात भरती होण्याची स्वप्नं उराशी बाळगले व ते सत्यात उतरवले.

    आता सेवानिवृत्त झालो असुन मनापासून कामात झोकून दिल्याने , सर्व सहकारी मित्र यांचे सहकार्य, व मार्गदर्शन मिळाल्याने खात्यात चांगले काम करु शकलो असे देखील त्यांनी सांगितले. सेवानिवृत्ती नंतर शेती व समाज कार्य याकडे लक्ष देणार असल्याचे सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक सुभाष रुपनवर यांनी सांगितले.

Leave a Comment

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

[adsforwp id="47"]