ठळक बातम्या

आमदार राहुल कुल कुरकुभं एमआयडीसीतील “प्रदुषणाबाबत आक्रमक” कामगार मंत्री याच्या उपस्थितीतील बैठकीत केल्या विविध मागण्या, अधिकाऱ्यांना धरले धारेवर…श्री सिमेंट कंपनीला “शिवसंग्रामचे नेते वसंत साळुंखे” यांचा इशारा अन्यथा…कुरकुंभ पोलीस चौकीला स्वतंत्र पुर्णवेळ अधिकाऱ्याची गरज, गस्तीसाठी अतिरिक्त वाहनाची आवश्यकता… “पी एम किसान” योजनेचे पैसे बंद झालेत, थेट दौंडच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील ‘पी एम किसान कक्ष अधिकारी सोमनाथ देसाई’ यांच्याशी संपर्क साधा -9561474001मोबाईलवर “PM किसान” ची ‘APK फाईल’ आलीय तर बैंक खाते होवू शकते रिकामं, कृषी विभागाने केलंय हे महत्त्वाचे आवाहन – ही घ्या काळजी…

मराठा आरक्षणाची धग वाढतेय, दौंड मध्ये या मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी तहसीलदारांना निवेदन…

पुणेरी टाइम्स टीम…

     दौंड तालुक्यात 20हजारच्या आसपास कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत, त्याची यादी ज्या त्या गावच्या तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालयात प्रसिद्ध करावी, कुणबी दाखले काढण्यासाठी येत असलेल्या जाचक अटी कमी कराव्यात ,त्यासाठी येणाऱ्या अडचणी मध्ये सुलभता आणावी, कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी तालुक्यातील सर्व सर्कल कार्यालयात आठवड्यातून एक दिवस कॅम्प आयोजित करावा कुणबी दाखला मिळणेसाठी अर्जदाराने अर्ज दिल्यानंतर त्याच्या कागदपत्रांची पडताळणी तहसील कार्यालयाने त्यांचे संकेत स्थळावर जी कुणबी कागदपत्रांची यादी प्रसिध्द केलेली आहे त्यावरून पडताळणी करावी व आठ दिवसात अर्जदारास कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे वेगळ्या कागदपत्रांची मागणी करू नये, कुणबी दाखले देण्यासाठी तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात यावा, गृह चौकशीसाठी नेमलेल्या समितीची मुदत एक वर्ष ठेवावी इत्यादी कुणबी प्रमाणपत्र संदर्भात मागण्यांचे निवेदन मा.तहसीलदार दौंड यांना जय शिवसंग्राम चे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव साळुंखे यांनी आज नायब तहसिलदार तुषार बोरकर यांना दिले तसेच उपविभागीय अधिकारी, दौंड उपविभाग, दौंड यांनाही स्वतंत्र निवेदन दिले त्यामध्ये या वेगवेगळ्या केलेल्या मागण्यांची त्वरीत दखल घेऊन कार्यवाही न केल्यास शुक्रवार दि.१४जून पासून तहसील कार्यालय दौंड येथे आमरण उपोषण सुरू करण्यात येईल असेही या निवेदनात स्पष्ट म्हटलेले आहे याप्रसंगी सकल मराठा समाजाचे राजाभाऊ कदम, अण्णासाहेब दोरगे, मंगेश फडके, संजय शिंदे, कैलास शितोळे, अमित पवार, संजय पहाणे, पांडुरंग कुतवळ,सचिन जगताप, मचिंद्र काळभोर, वसीम शेख, मयूर सूर्यवंशी, अंबादास काळे, छबुदादा ढवळे, सचिन बागल इत्यादी उपस्थित होते.

Leave a Comment

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

[adsforwp id="47"]