पुणेरी टाइम्स टीम…
शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक विसयो- २०१८/प्र.क्र.६२/विसयो मंत्रालय मुंबई दि. २० ऑगस्ट २०१९ चे शासन निर्णयाप्रमाणे संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील अनुदान घेत असलेल्या सर्व लाभार्थ्यांना १ जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीत हयात असलेचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. तसेच दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर एप्रिल ते जुन या कालावधीत (५० वर्षावरील लाभार्थ्यांना दर ५ वर्षांनी) उत्पन्न दाखला देणे सक्तीचे असते.
परंतु उपरोक्त कालावधीत लोकसभा निवडणूक कार्यक्रम असल्याने हयातीचे व उत्पन्नाचे दाखले लाभार्थ्यांना जमा करणे शक्य झाले नाही. सध्या तीव्र उन्हाळा असल्याने तापमान ४० अंश डीग्री च्या आसपास असलेने उष्मघातचा वयोवृध्द लाभार्थ्यांना त्रास होवू शकतो. त्यामुळे गाव स्तरावर तलाठी कार्यालयात लाभार्थ्यांचे हयातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, आधार लिक बैंक पासबुक, आधारकार्ड जमा करून घ्यावेत व पुढील आदेशानुसार जमा झालेले कागदपत्रे तहसिल कार्यालय (संजय गांधी) शाखेत जमा करावेत. कोणत्याही लाभार्थ्यांस तहसिल कार्यालयात पाठवु नये. असे आदेश तहसिल कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.