पुणेरी टाईम्स टीम
बारामती तालुक्यातील निरावागज येथील किरण काळूराम नारायण भोसले या मुलीची भारतीय संघात निवड झाली आहे, तिला पुढील वाटचालीसाठी दीड लाख रुपयाची आवश्यकता होती. मात्र घरची परिस्थिती हालाखीची असल्याने हे अशक्य होते. मग कुटुंबीयांनी गावातील रविदास प्रतिष्ठान कडे आर्थिक मदतीबाबत चौकशी केली. प्रतिष्ठानने ही सकारात्मक भूमिका घेत मदतीचे आव्हान केले. तदनंतर मदतीचा ओघ सुरू झाला. काही वेळातच दानशूर व्यक्तिमत्त्वांनी पुढे येत व तरुणांनी एकत्र येत लाख मोलाची मदत जमा करून केली. माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक पंकज भोसले यांनी 30 हजार रुपये, उपप्रादेशिक परिवहन विभागातील सुरेश आगवणे यांनी 20000 रुपये, नितीन भोसले यांनी 20000 रुपये , शितल लोखंडे यांनी 10000 रुपये, अविनाश भोसले यांनी 3000 हजार रुपये, रोहिदास प्रतिष्ठान यांनी 5000 हजार रुपये असे एकत्र येत 1 लाख 11 हजार रुपये अवघ्या काही काळात जमून ही रक्कम किरण व कुटुंबीयांना दिली. किरणच्या या वाटचालीसाठी केलेल्या मदतीमुळे किरण व कुटुंबीयांचे मन भरून आले होते. यावेळी दानशूर दात्यांनी केलेल्या मदतीबाबत रविदास प्रतिष्ठान व कुटुंबीयांकडून आभार मानण्यात आले आहेत.