ठळक बातम्या

आमदार राहुल कुल कुरकुभं एमआयडीसीतील “प्रदुषणाबाबत आक्रमक” कामगार मंत्री याच्या उपस्थितीतील बैठकीत केल्या विविध मागण्या, अधिकाऱ्यांना धरले धारेवर…श्री सिमेंट कंपनीला “शिवसंग्रामचे नेते वसंत साळुंखे” यांचा इशारा अन्यथा…कुरकुंभ पोलीस चौकीला स्वतंत्र पुर्णवेळ अधिकाऱ्याची गरज, गस्तीसाठी अतिरिक्त वाहनाची आवश्यकता… “पी एम किसान” योजनेचे पैसे बंद झालेत, थेट दौंडच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील ‘पी एम किसान कक्ष अधिकारी सोमनाथ देसाई’ यांच्याशी संपर्क साधा -9561474001मोबाईलवर “PM किसान” ची ‘APK फाईल’ आलीय तर बैंक खाते होवू शकते रिकामं, कृषी विभागाने केलंय हे महत्त्वाचे आवाहन – ही घ्या काळजी…

बारामतीत पोलीसांनी आवळल्या माफियांच्या मुसक्या, एका चारचाकी सह ३१ लाखांचा ‘मुद्देमाल हस्तगत’ वाचा सविस्तर…

पुणेरी टाइम्स टीम (ता. बारामती) बारामती तालुक्यातील सुपे पोलीसांनी शिताफीने एका चारचाकी वाहनसह गुटखा व सुमारे ३१ लाखांचा मुद्देमाल सुपे पोलीसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणी प्रशांत गांधी यास पोलीसांनी अटक केली असून, त्यास न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुग्गड यांना गोपनीय माहिती मिळाल्याने बारामती मधील प्रशांत गांधी यांच्या घरात बेकायदेशीरपणे पान मसाला व गुटखा आहे अशी माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलीसांंनी गुटखा माफिया प्रशांत धनपाल गांधी यांच्या बारामती मधील घरी छापा मारला सुरूवातीला बारामती येथील घराची झडती घेतली असता माल कोणतीही माल मिळाला नाही. मात्र चौकशी दरम्यान प्रशांत धनपाल गांधी (वय ४८, रा.लासुर्णे, ता.इंदापूर, जि. पुणे, सध्या रा. ऋषिकेश अपार्टमेंट, पेन्सील चौक, बारामती), याने निसार (रा. विजापूर, कर्नाटक पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही), यांचेकडून आणलेला गुटखा पान मसाला व माल राहुल मलबारी (रा.यवत, ता. दौंड, जि. पुणे) यांना देण्यासाठी आणलेला गुटखा उंडवडी सुपे येथील फार्म हाऊसमध्ये माल लपून ठेवल्याचे समजले. त्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुग्गड यांनी तातडीने सुत्रे हालवून सुपे पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील व पथकाला गांधी यांच्या फार्म हाऊसवर अवैध सुगंधी पान मसाला व गुटखा असल्याची माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी पथकासह तातडीने घटनास्थळी जावून अवैध सुगंधी पान मसाला, गुटखा व एक वाहन असा एकूण ३० लाख, ९८ हजार, ८२० रूपयांचा मुद्देमाल आरोपीसह ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. याबाबत कसून चौकशी केल्यानंतर यवत (ता. दौंड) येथे सदरचा मुद्देमाल गुटखा घेवून जात असताना गाडी नादुरूस्त झाल्याने सदरील पान मसाला व गुटखा येथील फार्म हाऊसवर ठेवल्याची कबुली गांधी याने पोलीसांना चौकशी दरम्यान दिली.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून या कारवाई मध्ये सुपे पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक नागनाथ पाटील, पोलीस उपनिरिक्षक योगेश घोडके, जिनेश कोळी, लेंडवे, देशमुख, हवालदार काळे, इंगवले, तुषार ढावरे, सुदर्शन डोळाळकर यांचा सहभाग होता. या बाबतचा पुढील तपास सहायक पोलीस निरिक्षक नागनाथ पाटील करीत आहेत.

Leave a Comment

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

[adsforwp id="47"]