ठळक बातम्या

क्रीडामंत्री ‘दत्तात्रय भरणे’ गोविंदाच्या सुरक्षितेसाठी धावले, इंदापूरच्या आठ दहीहंडी संघांना “मॅट” उपलब्ध करून देणार…“सायबर गुन्हेगारी” रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलावीत – आमदार ‘राहुल कुल’ यांची विधानसभेत मागणीदौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…मलठणच्या उपसरपंचदी आमदार ‘राहुल कुल’ गटाच्या “सोनाली जगताप” बिनविरोध…राज्याच्या राजकारणात राहुल कुलांचा यशस्वी डाव, काँग्रेस-राष्ट्रवादीतील असंतोषाचा भाजपला फायदा; कुल यांच्या नेतृत्वात राजकारणातील मोठे चेहरे भाजपात…

पुणे जिल्ह्यातील पोलीस पाटलांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे, प्रशिक्षणाने भविष्यातील आपत्तीवर मात करण्यास पोलीस पाटील सक्षम…

पुणेरी टाइम्स टीम… (निलेश जांबले)

पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हा, भोर, पुरंदर, बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, हवेली या 13 तालुक्यामध्ये पोलिस पाटील यांच्या रिक्त जागी नुकत्याच नवीन पोलीस पाटील यांच्या नियुक्ती केल्या आहेत.  पोलीस पाटील हा गाव पातळीवरील प्रशासनातील प्रमुख दुवा आहे. त्यामुळे गावावरती आलेल्या आपत्तीचे प्राथमिक निराकरण करताना अनेक पोलीस पाटलांना अडचणी येतात. या अडचणीचे निराकरण करण्यासाठी पोलीस पाटलांना त्याबाबतची माहिती आवश्यक असने गरजेचे आहे. त्या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्या विद्यमाने पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत हे दोन दिवसीय प्रशिक्षण पोलीस पाटलांना देण्यात येत आहे. सदरचे प्रशिक्षण हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षक राहुल पोखारकर हे देत आहेत. दौंड येथील प्रशिक्षणादरम्यान यावेळी तहसीलदार अरुण शेलार, नायब तहसीलदार भंडारे- देशमुख मॅडम उपस्थित होते.


या प्रशिक्षणाने आपत्तीवर मात करण्याचे कौशल्य पोलीस पाटलांना अवगत होत असून गावामध्ये अचानक कोणतीही आपत्ती आल्यास पोलीस पाटील त्यावरती सक्षम मात करू शकतात, तसेच दरड कोसळने, भूस्खलन होण्याची संभव्यतः असते, मान्सून कालावधीत गावांचा संपर्क तुटणे, नदी/ नाल्यात मनुष्य किंवा जनावरे वाहून जाणे, अश्या प्रकारची कोणतीही आपत्ती घडल्यास घटनास्थळी तात्काळ पोलिस पाटील उपस्थित होत असतात. पोलिस पाटील यांना घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना / स्त्रोत याची पुरेपूर माहिती असणे आवश्यक आहे. तसेच भविष्यात आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवल्यास घटनास्थळी तात्काळ काय केले पाहिजे? याबाबत जिल्ह्यातील पोलिस पाटील प्रशिक्षित व सुसज्य असणे गरजेचे आहे.

  हे प्रशिक्षण हे पोलीस पाटलांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत गाव कामगार पोलीस पाटील संघाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख योगेश बोबडे पाटील व गाव कामगार पोलीस पाटील संघाचे राज्य खजिनदार निळकंठ थोरात यांनी यावेळी सांगितले…

Leave a Comment

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

[adsforwp id="47"]