पुणेरी टाइम्स टीम…महाराष्ट्रातील एक वैशिष्ट्यपूर्ण भटकी जमात असलेल्या नंदीवाले समाज आपल्या उदरनिर्वाहासाठी गावोगावी जाऊन आपली उपजीविका पार पाडतो. या समाजाला जात प्रमाणपत्राच्या अभावी शिक्षण व नौकरीच्या सुविधांपासून वंचित राहावे लागते. नंदीवाले समाजाला जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी आपण सतत प्रयत्नशील आहोत नुकतेच भांडगावमध्ये वास्तव्यास असलेल्या नंदीवाले समाजाच्या ५० नागरिकांचे जात प्रमाणपत्राचे वाटप आमदार राहुल कुल यांच्या हस्ते करण्यात आले. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर जातीचे दाखले मिळाल्या नंतर गोरगरीब नंदीवाले समाजाच्या चेहऱ्यावरील समाधान अवर्णनीय होते.
या प्रसंगी कर्तव्य फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. शाम कापरे, ग्रामपंचायत सदस्य श्री. सदाशिव दोरगे, श्री. विजराज दोरगे, श्री. प्रमोद दोरगे, श्री. संदीप दोरगे, श्री. रामदास तात्या दोरगे, श्री. सोमनाथ हरपळे, श्री. संतोष कदम आणि यवत येथील महा ई सेवा केंद्राचे अजय पांढरे उपस्थित होते.