पुणेरी टाइम्स टीम… मलठणचे सामाजिक कार्यकर्ते ‘नितीन भिमराव वाळके’ यांची दौंड तालुका ‘भारतीय जनता पार्टीच्या’ मुख्य कार्यकारणी उपाध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे… याबाबतच्या निवडीचे पत्र दौंड तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष हरिश्चंद्र ठोंबरे यांनी दिले आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा महिला अध्यक्ष कांचन कुल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश जगदाळे, ॲड. नितीन अवचट, मनोहर इंगवले, कैलास चव्हाण, उपस्थित होते.
