ठळक बातम्या

क्रीडामंत्री ‘दत्तात्रय भरणे’ गोविंदाच्या सुरक्षितेसाठी धावले, इंदापूरच्या आठ दहीहंडी संघांना “मॅट” उपलब्ध करून देणार…“सायबर गुन्हेगारी” रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलावीत – आमदार ‘राहुल कुल’ यांची विधानसभेत मागणीदौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…मलठणच्या उपसरपंचदी आमदार ‘राहुल कुल’ गटाच्या “सोनाली जगताप” बिनविरोध…राज्याच्या राजकारणात राहुल कुलांचा यशस्वी डाव, काँग्रेस-राष्ट्रवादीतील असंतोषाचा भाजपला फायदा; कुल यांच्या नेतृत्वात राजकारणातील मोठे चेहरे भाजपात…

आता दौंड मध्ये महिला मुलींना त्रास देणाऱ्याची गय नाही, त्रास देणाऱ्या तीन फरार आरोपी अखेर जेरबंद- दौंड पोलीसांची कारवाई…

पुणेरी टाइम्स टीम… मुली-महीलांची छेडछाड करून त्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास देणाऱ्यांवर दौंड पोलिसांनी कारवाईचे सत्र सुरु केले आहे. त्यामध्ये अल्पवयीन मुलींना त्रास देण्याच्या घटना पाहता दौंड पोलिसांनी विशेष लक्ष घातले आहे.दौंड पोलिसांनी मागील काही दिवसात घडलेल्या गुन्ह्यातील आरोपी अटक केले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी,दि.१९ एप्रिल २०२३ रोजी आरोपी राकेश उर्फ रोहित विजय गुळीग (रा.वडारगल्ली ता.दौंड) याच्याविरुद्ध छेडछाडीचा गुन्हा दाखल होता. सन २०२० रोजी आरोपी महेश दिलीप रंधवे (रा.मलठण ता दौंड) याच्यावर छेडछाडीसह पोस्कोचा गुन्हा दाखल होता. त्यानंतर दि.६ जुलै २०२३ रोजी आरोपी लॉरेन्स विल्यम विश्वास (रा.वेताळनगर दौंड) याच्याविरुद्धही छेडछाड व पोस्कोचा गुन्हा दाखल होता. सदर गुन्हातील आरोपी गुन्हा घडल्यापासून फरार होते. गुन्ह्याच्या अनुषंगाने मुली महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायम सतर्क असलेल्या पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी याबाबत विशेष मोहीम राबवून महिलांची छेडछाड व त्रास देणाऱ्या फरार आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दौंड पोलिसांनी अल्पवयीन मुलींची छेडछाड करणाऱ्या या फरार आरोपीना अटक केली आहे. दोन आरोपींना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, दौंड विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, गुन्हे शोध पथकाचे पोलिस हवालदार सुभाष राऊत, नितीन बोराडे, शरद वारे, विशाल जावळे, आदेश राऊत, अमोल देवकाते आदींनी केली आहे. या घटनांचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया दुरंदे या करीत आहेत.

महिला मुलींना त्रास देणाऱ्यांची गय नाही- शाळा महाविद्यालय, सार्वजनिक ठिकाणी ज्ञात अज्ञाताकडून महिला व मुलींना त्रास देण्याच्या घटना घडत असतील तर त्रास देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. जर अशा घटना घडत असतील किंवा त्रास देण्याचा प्रयत्न होत असेल तर तात्काळ दौंड पोलीसांना कळवावे. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.‘चंद्रशेखर यादव’ – पोलीस निरीक्षक दौंड 

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

Leave a Comment

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या ‘अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या’ घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवा, आमदार “राहुल कुल” यांची विधानसभेत मागणी…

[adsforwp id="47"]