पुणेरी टाइम्स टीम…
महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघ संलग्न दौंड तालुका पोलीस पाटील संघाचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे. दौंड तालुका पोलीस पाटील संघाच्या अध्यक्षपदी जिरेगावचे विद्यमान पोलीस पाटील आनंदराव बाबुराव गाढवे पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष सुधीर पाटसकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दादा पाटील काळभोर, तसेच महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शितोळे पाटील, तसेच खजिनदार निळकंठ थोरात पाटील, राज्य संघटक नवनाथ धुमाळ पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तृप्ती ताई मांडेकर व राज्य सदस्य तनुजा कुतवळ हे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा अध्यक्ष राळे पाटील, महिला पुणे जिल्हा अध्यक्ष हर्षदा सपकाळ, बारामतीचे तालुकाध्यक्ष गोविंदराव जगताप, हवेलीचे टिळेकर पाटील, शिरूरचे करपे पाटील, मावळचे शितोळे पाटील, पुरंदरचे इंगळे पाटील, खेडचे अमोल पाचपुते पाटील, इंदापूरच्या सोनाली बोडके आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्य कार्यकारिणी सदस्य, जिल्हा कार्यकारणी सदस्य, तसेच पुणे जिल्ह्यातील अन्य तालुक्यातील तालुका कार्यकारणी सदस्य, मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी आपल्या मनोगतांमध्ये नवनिर्वाचित कार्यकारिणीला पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस पाटलांना कायदेशीर बाबींचे ज्ञान अवगत होण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष सुधीर पाटसकर यांनी आपल्या मनोगत मधून व्यक्त केली होती. यावेळी समरोपीय भाषणांमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव यांनी पोलीस पाटलांना तातडीने मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी अध्यक्षीय भाषणांमध्ये बाळासाहेब शिंदे पाटील यांनी दौंड तालुका पोलीस पाटील संघाच्या नूतन कार्यकारणी शुभेच्छा देत, पोलीस पाटलांना येणाऱ्या अडचणी, मानधन वितरणामध्ये येणाऱ्या प्रशासकीय अडचणी, पोलीस पाटील गावचा केंद्रबिंदू कसा आहे याबाबत मनोगत व्यक्त करताना कोरोना मध्ये संपूर्ण जनता घरामध्ये असताना पोलीस आणि पोलीस पाटील फक्त रस्त्यावर होता हे आवर्जून उल्लेख करीत कोरोना महामारीमध्ये मृत्यू झालेल्या संघटनेच्या 48 सभासदांच्या कुटुंबियांना शासनाची प्रत्येकी 50 लाख रुपये मदत मिळवून देण्यात आली. हे फक्त संघटनेमुळेच शक्य असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले तसेच महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या कार्याचा आढावा सांगितला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक किशोर देवकर यांनी केले तर आभार रेश्मा शितोळे पाटील यांनी मानले.
ठळक बातम्या
कुरकुंभ MIDC परिसरात ‘प्लेटची’ चोरी करणाऱ्या ‘चार चोरट्यानां’ दौंड पोलीसांनी कडून बेड्या, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त- सपोनि नागनाथ पाटील यांची माहिती……दौंड मध्ये’ रमेश थोरातां’साठी “शरद पवार” कोणता डाव टाकणार? महाविकास आघाडीची आज वरवंडला जाहीर सांगता सभा…दौंडच्या राजकारणात नवा ट्विस्ट येणार! खासदार ‘निलेश लंके’ यांचे आव्हान आमदार ‘राहुल कुल’ यांनी स्विकारले, विरोधकांच्या “भूमिकेकडे” तालुक्याचे लक्ष…?निवडणूकीच्या धामधुमीत ‘आमदार राहुल कुलांकडून’ आरोग्य सेवेचे व्रत सुरूच, महिनाभरात “वीसहुन” अधिक रुग्णांना मदत…दौंड विधानसभा मतदारसंघाकरीता निवडणूक निरीक्षक म्हणून एम गौतमी यांची नियुक्ती