महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघ संलग्न दौंड तालुका पोलीस पाटील संघाच्या अध्यक्षपदी जिरेगाव येथील आनंदराव बाबुराव गाढवे पाटील यांची निवड करण्यात आली आहे…
दौंड तालुका पोलीस पाटील संघाच्या नूतन कार्यकारणीचा पदग्रहण सोहळा उद्या जिरेगाव ता. दौंड, हनुमान नगर (जाधववाडी) येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दौंड चे विद्यमान आमदार ॲड. राहुल कुल, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष सुधीर पाटसकर, दौडंचे विभागीय अधिकारी मिनाज मुल्ला, उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल जाधव, दौंडचे तहसीलदारअरुण शेलार, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, वनपरिक्षेत्राधिकारी कल्याणी गोडसे उपस्थित राहणार आहेत.
तसेच सदरील कार्यक्रमासाठी सन्माननीय उपस्थिती म्हणून दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील हे उपस्थित राहणार आहेत…
Read more… https://puneritimes.com/maharashtra/15686/