पुणेरी टाइम्स टीम…
दौंड शहरातील पोदार इंटरनॅशनल स्कूल ही प्रशाला नेहमीच निरनिराळे व कौशल्यपूर्ण शालेय उपक्रम हे राबवत आहे. त्याअनुषंगाने विद्यार्थ्याना कला क्रिडा, अभ्यास , साहित्य, या व्यतिरिक्त, व्यवसाय कौशल्य आत्मसात व्हावे , तसेच आतापासूनच उद्योगाची मूल्ये त्यांच्यात रुजली जावीत हा मानस समोर ठेवून प्रशालेचे प्राचार्य विशाल जाधव व पोदार एज्युकेशन नेटवर्क यांच्या संकल्पनेने बिझ किड्स बझार हा आगळा वेगळा असा व्यावसायिकतेचे ज्ञान देणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रथम कार्यक्रमास लाभलेले प्रमुख अतिथी राज्य राखीव पोलिस ट्रेनिंग सेंटरचे पोलीस प्राचार्य- रामचंद्र केंडे समृध्दी ॲग्रो चे प्रतिनिधी
अंकुशराव नागवडे, प्रशालेचे प्राचार्य विशाल जाधव या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. तसेच सदर कार्यक्रमामध्ये, आजच्या आधुनिक विकसित तंत्रज्ञानाच्या युगात, प्रत्येकाची जीवनशैली ही उंचावली आहे. त्यामध्ये प्रदूषण ही वाढले आहे. तसेच शेती ही रासायनिक खते वापरून केली जाते. आणि याचं रासायनिक खते वापरून केलेल्या शेत मालापासून अनेक आजार हे बळावले जातात. म्हणूनच आपण सेंद्रिय शेती चा अवलंब करणे काळाची गरज आहे. तसेच मिलेट उत्पादन वस्तूंचावापर केला तर स्वास्थ उत्तम राहील ही बाब सर्वसामान्य जनतेस तसेच समाजातील प्रत्येक घटकाला ज्ञात व्हावी या उद्देशाने, या बाल चमूकल्यांची बाजारा मध्ये, इंटरनॅशनल येयर ऑफ मिलेट्स या संकल्पना घेऊन मिलेट्स प्रॉडक्ट चे हि प्रदर्शन भरवण्यात आले.
यासाठी समृध्दी अग्रो यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच, सदर बिझ किड्स बझार मध्ये, विद्यार्थ्यानी तयार केलेल्या निरनिराळ्या हँडीक्राफ्ट वस्तू , तसेच निरनिराळे खाद्य पदार्थ, दुर्मिळ भाज्या, पालेभाज्या, फळभाज्या, फळे, तसेच भारतीय कलेवर आधारित अश्या अनेक गृहोपयोगी वस्तू , यामध्ये प्रदर्शन व विक्री साठी ठेवण्यात आल्या. तसेच पालकांच्या ही सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी प्रशालेमध्ये, गायन कार्यक्रमाचे आयोजन हि करण्यात आले होते. सदर कार्यक्रमामध्ये, पहिली ते नववी च्या एक हजार विद्यार्थ्यांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला. तसेच प्रशालेने केलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे पालक वर्गातून खुप कौतुक होत आहे.
असे मत यावेळी बोलताना, प्राचार्य विशाल जाधव यांनी व्यक्त केले. तसेच आपण विद्यार्थी दशेत असतानाच व्यवसायाभिमुख शिक्षण किंवा ज्ञान हे आत्मसात करावे, व असे प्रतिपादन केले.
