पुणेरी टाइम्स टीम…
आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलठण क्र.1 येथे संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व भारतीय संविधानाचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षिका श्रीम. आशा बोरुडे यांनी केले.उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन केले.शाळेचे मुख्याध्यापक श्री.महेश भोंग यांनी संविधान दिनानिमित्त उपस्थितांना माहिती दिली.सदर कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविका सौ.शेंडगे मॅडम,मदतनीस सौ. वाळके मॅडम,श्री.मुरलीधर शेंडगे व आरपी आय युवा नेते अभिषेक शेंडगे व पालक उपस्थित होते*
