पुणेरी टाइम्स टीम…
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे तसेच मराठा समाजाला ओबीसी आरक्षण लागू करावे या मागणीसाठी मराठा योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा लढा उभारलेला आहे, असे असतानाच शासनाने जरांगे पाटील यांच्याकडून मुदत घेऊन साठ दिवसाठी आंदोलन स्थगित केले आहे . असे असले तरी मनोज जरांगे पाटील यांनी उपचारातून बरे होताच तिसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला सुरुवात केली आहे,